नवी दिल्ली - जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशीप स्पर्धा 2021 चे आयोजन अमेरिकेच्या यांकटन येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार असून भारतीय संघ या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
ऑलिम्पिक डॉट कॉमच्या बातमीनुसार, आठवडाभर चालणारी ही स्पर्धा पुरूष, महिला, मिश्र आणि टीम डिविजन कंपाउंड तसेच रिकर्वच्या दोन्ही श्रेणीमध्ये होणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेले दीपिका कुमारी आणि अतनु दास भारतीय संघात नाही. माजी आशियाई क्रीडा पदक विजेता अभिषेक वर्मा आणि मागील स्पर्धेत कास्य पदक जिंकणारी ज्योती वेन्नम यांच्यावर भारताची मदार असणार आहे. युवा खेळाडू कोमलिका बारी, आदित्य चौधरी आणि पार्थ साळुंखे हे रिकर्वमध्ये भारताचे नेतृत्व करतील.
2019 मध्ये ही स्पर्धा नेदरलँडमध्ये पार पडली होती. यात भारताने एक रौप्य आणि कास्य पदक जिंकत पदकतालिकेत सहावे स्थान पटकावले होते.
भारतीय संघ -
- कम्पाउंड पुरूष : संगमप्रीत बिस्ला, अभिषेक वर्मा, रिषभ यादव
- कम्पाउंड महिला : प्रिया गुर्जर, मुस्कान किरार, ज्योनी कन्नम
- रिकर्व पुरूष : आदित्य चौधरी, पार्थ साळुंखे, अतूल वर्मा
- रिकर्व महिला : अंकिता भकत, कोमालिका बारी, रिधी फोरी.
हेही वाचा - IPL 2021: लसिथ मलिंगाने चार वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्ससोबतचा अनुभव केला शेअर
हेही वाचा - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरूवात, मुंबई-चेन्नई आमने-सामने