नवी दिल्ली - आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी चांगला ठरला. या दिवशी भारताच्या तीन महिला कुस्तीपटूंनी सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला. दिव्या काक्रानने ६८ किलो, पिंकीने ५५ किलो आणि सरिता मोरने ५९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
हेही वाचा - NZ Vs IND : ..असा कारनामा करणारा रॉस टेलर ठरला जगातील पहिलाच खेळाडू
दिव्या काक्रानने अंतिम सामन्यात मंगोलियाच्या डल्गुन बोलोरमाचा २-१ असा पराभव केला. महिलांच्या ५५ किलो वजनी गटातील अंतिम लढतीत पिंकीने मंगोलियन दुल्गुन बोलोरमाचा २-१ असा पराभव केला. तर, सरिताने अंतिम सामन्यात मंगोलियाच्या बटसेटसेग अल्टंटसेटसेगचा ३-२ असा पराभव केला.
नवजोत कौर ही आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होती. किर्गीझस्तानमधील बिश्केक येथे २०१८ मध्ये ६५ किलो गटात तिने सुवर्णपद जिंकले होते.