नवी दिल्ली: ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा ( Olympic champion Neeraj Chopra ) गुरुवारी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ध्वजवाहक म्हणून देशाचे नेतृत्व करणार ( CWG opening ceremony Neeraj Chopra flag bearer ) होता. पंरतु आता त्याने ही संधी गमावल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकण्याच्या मोहिमेदरम्यान भाला फेकणारा जखमी झाला होता. 24 वर्षीय सुपरस्टार बर्मिंगहॅममध्ये त्याच्या विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी सज्ज होता, परंतु एमआरआय स्कॅनमध्ये किरकोळ दुखापत झाल्याचे समोर आल्यानंतर त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली ( Neeraj Chopra withdraws from Commonwealth Games ).
चोप्राने आपल्या सोशल मीडिया हँडलवर ( Neeraj Chopra Social Media Post ) म्हटले आहे की, "बर्मिंगहॅममध्ये मी देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही, याचा मला खेद आहे. विशेषत: उद्घाटन समारंभात भारतीय संघाचा ध्वजवाहक होण्याची संधी गमावल्याने मी निराश आहे. सध्या माझे संपूर्ण लक्ष माझ्या पुनर्वसनावर असेल आणि मी शक्य तितक्या लवकर मैदानात परतण्याचा प्रयत्न करेन.'' चोप्रा बाहेर पडल्याने अॅथलेटिक्समधील भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वेळचा चॅम्पियन चोप्रा पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात होता.
- — Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) July 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) July 26, 2022
">— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) July 26, 2022
चोप्रा म्हणाला, "जागतिक चॅम्पियनशिपच्या चौथ्या थ्रोदरम्यान मला ताण आल्याने अस्वस्थता जाणवत ( Neeraj Chopra injured ) होती. काल अमेरिकेत झालेल्या तपासणीत ती किरकोळ दुखापत असल्याचे आढळून आले, त्यामुळे मला काही आठवडे पुनर्वसन करण्याचा सल्ला दिला आहे." या स्टार खेळाडूने देशवासीयांना इतर भारतीय सहभागींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. चोप्रा म्हणाला, "गेल्या काही दिवसांत मला सर्व देशवासीयांकडून मिळालेल्या प्रेम आणि आदराबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मला आशा आहे की, राष्ट्रकुलमधील आपल्या देशाच्या सर्व खेळाडूंसाठी तुम्ही सर्व अशाच प्रकारे सपोर्ट कराल. जय हिंद."
हेही वाचा - Wi Vs Ind 3rd Odi : विंडीजशी आज तिसरा वनडे सामना; भारताचा क्लीन स्वीपचा निर्धार