गुजरात/अहमदाबाद : आयपीएलचा थरार लवकरच सुरू होणार आहे. आयपीएलच्या या थरारामध्ये आपल्याला एकूण 16 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. या हंगामात एकूण 74 सामने पाहायला मिळणार आहेत. मागील 15 व्या हंगामात अंतिम सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्था राॅयल्स यांच्यात झाल्याचा पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत राजस्थान राॅयल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. गुजरात टायटन्सची विशेषतः ही आहे की, त्यांनी प्रथमच आयपीएलमध्ये प्रवेश करून विजेतेपद पटकावले.
![Check out Reliable Schedule of Which Mighty Team will Clash with Whom in Epic Battle of IPL 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18135664_ipl7.jpg)
![Check out Reliable Schedule of Which Mighty Team will Clash with Whom in Epic Battle of IPL 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18135664_ipl8.jpg)
पहिली लढत गुजरात वि. चेन्नई : गतविजेत्या गुजरात टायटन्सची आयपीएल २०२३ च्या प्रथम सामन्यात ३१ मार्च रोजी अहमदाबादमध्ये चेन्नई सुपर किंग्जशी लढत आहे. उद्घाटन डब्ल्यूपीएल म्हणजेच महिला आयपीएल पूर्ण झाल्यानंतर पाच दिवसांनी स्पर्धेची १६ वी आवृत्ती सुरू होईल. दुस-या दिवशी 1 एप्रिल रोजी दुहेरी हेडरनंतर सलामीचा सामना होईल आणि दिवसाच्या पहिल्या गेममध्ये पंजाब किंग्ज कोलकाता नाईट रायडर्सशी भिडतील आणि त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. 2 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादचा हंगामातील पहिला सामना राजस्थान रॉयल्सशी होईल आणि त्याच दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
![IPL 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18135664_ipl3.jpg)
![IPL 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18135664_ipl4.jpg)
आयपीएल उद्घाटन सोहळा - 2023 चा टाटा आयपीएल सीझनचा उद्घाटन सोहळा गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. ३१ मार्च रोजी उद्घाटनाच्या सत्रात अनेक रंगारंग कार्यक्रम सादर होणार आहेत. यामध्ये अभिनेता टायगर श्रॉफ, कॅटरिना कैफ, रश्मिका मंदान्ना आणि गायक अरजित सिंग देखील यावर्षीच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत.आयपीएल 2023 ची सुरुवात शुक्रवारी 31 मार्च रोजी बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या वर्षीचा विजोता संघ गुजरात टायटन्स यांच्यातील लढतीने होणार आहे. 31 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सलामीचा सामना होईल. देशात 12 ठिकाणी यंदाचा आयपीएल खेळला जाईल आणि स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी अहमदाबादमधील याच ठिकाणी खेळला जाईल.
![IPL 2023](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18135664_ipl1.jpg)
हेही वाचा : IPL 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे इंडियन प्रीमियर लीग 2023 चा भव्य उद्घाटन समारंभ सोहळा सुरू