ऑलिम्पिक पात्रता : मनिषचा ऐतिहासिक पंच, भारताला ९ वा ऑलिम्पिक कोटा - boxing
मनिषने ६३ किलो वजनी गटाच्या बॉक्स ऑफ बाउट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हेरिसन गार्साइडचा ४-१ ने धुव्वा उडवत ही कामगिरी नोंदवली. मनिषने २०१८ च्या राष्ट्रमंडल स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. तो पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी प्राप्त ठरला आहे.
अम्मान (जॉर्डन) - भारतीय पुरुष बॉक्सिंगपटू मनिष कौशिकने आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या 'बॉक्स ऑफ बाउट' सामना जिंकत टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळवला. भारताचा बॉक्सिंगमधील हा ऐतिहासिक ९ वा कोटा ठरला.
ऑलिम्पिक इतिहासात भारताने पहिल्यांदाच सर्वाधिक ९ खेळाडूंनी कोटा मिळवला आहे. याआधी भारताने २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ८ तर २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये ६ कोटा प्राप्त केले होते.
मनिषने ६३ किलो वजनी गटाच्या बॉक्स ऑफ बाउट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हेरिसन गार्साइडचा ४-१ ने धुव्वा उडवत ही कामगिरी नोंदवली. मनिषने २०१८ च्या राष्ट्रमंडल स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. तो पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी प्राप्त ठरला आहे.
दुसरीकडे भारताचा सचिन ८१ किलो वजनी गटाच्या बॉक्स ऑफ बाउट सामन्यात पराभूत झाला. त्याला तजाकिस्तानच्या शाबोस नेगमातुएलोव्हने ५-० ने मात दिली. या पराभवासह सचिनचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले.
कौशिक आणि सचिन आशियाई पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने, त्यांना बॉक्स ऑफ बाउट सामन्याची संधी मिळाली होती.
हेही वाचा - ऑलिम्पिक पात्रता : विकास अंतिम फेरीत, पांघल, लवलिना यांना कांस्य पदकावर समाधान
हेही वाचा - ऑलिम्पिक पात्रता : सिमरनजीत कौर अंतिम फेरीत, मेरी कोमला 'कांस्य'