ETV Bharat / sports

पराभव जिव्हारी; बबिता फोगाटच्या मामेबहिणीची गळफास घेऊन आत्महत्या - कुस्तीपटू रितिकाची आत्महत्या न्यूज

भारतीय कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगाटची मामेबहीण रितिकाने बलाली गावातील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने निराश झालेल्या रितिकाने आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे.

Babita Phogat sister ritika commits suicide after losing wrestling match
अंतिम सामन्यात पराभव, बबिता फोगाटच्या मामेबहिणीची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Mar 17, 2021, 10:06 PM IST

Updated : Mar 17, 2021, 10:13 PM IST

चरखी दादरी/झुंझुनूं - भारतीय कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगाटची मामेबहीण रितिकाने बलाली गावातील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने निराश झालेल्या रितिकाने आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे.

रितिका पहिलवान महाबीर फोगाट यांच्या अकादमीमध्ये पाच वर्षांपासून सराव करत होती. तिने १२ ते १४ मार्च या दरम्यान भरतपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सब-ज्यूनियर आणि ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. १४ मार्चला झालेल्या अंतिम सामन्यात रितिकाचा अवघ्या एका गुणाने पराभव झाला. हा सामना पाहण्यासाठी महाबीर फोगाट देखील उपस्थित होते.

अंतिम सामन्यातील पराभवाचा रितिकाला खूपच मोठा धक्का बसला होता आणि ती नैराश्यात होती. १५ मार्च रोजी रात्री ११च्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. तिचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

हेही वाचा - भवानी देवी ऑलिम्पिकसाठी पात्र, ठरली भारताची पहिली तलवारबाज

हेही वाचा - महिला क्रिकेट: पराभवाची मालिका सुरूच, पाचव्या वनडेत अफ्रिकेचा भारतावर ५ गडी राखून विजय

Last Updated : Mar 17, 2021, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.