नवी दिल्ली - उद्यापासून (१८ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंचा व्हिसा मंजूर केला आहे. यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा स्पर्धेतील सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या भीतीने चीनच्या खेळाडूंचा व्हिसा अद्याप भारताकडून मंजूर करण्यात आलेला नाही. चीन खेळाडूंबाबत आज निर्णय घेतला जाणार आहे.
भारताने पाकिस्तानचे चार कुस्तीपटू, एक प्रशिक्षक आणि एक सामनाधिकारी यांचा व्हिसा मंजूर केला आहे. याविषयी भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितलं की, पाकच्या ४ कुस्तीपटूंसह एक प्रशिक्षक आणि एक सामनाधिकारीला व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. चीनमधील कोरोना व्हायरसची भीती हा मोठा चिंतेचा विषय आहे. यामुळे त्यांना अद्याप व्हिसा देण्यात आलेला नाही. पण, आज चीनच्या खेळाडूंबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
अशी आहेत भारताने मंजूर केलेल्या व्हिसाधारक कुस्तीपटूंची नावे -
- मोहम्मद बिलाल (५७ किलो),
- अब्दुल रहमान (७४ किलो),
- तयब रझा (९७ किलो)
- झामन अन्वर (१२५ किलो)
भारताने 'या' कारणाने केला पाक खेळाडूंचा व्हिसा मंजूर -
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या नियमाप्रमाणे, भारत पाक खेळाडूंचा व्हिसा नाकारु शकत नाही. जर भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा नाकारलं असता तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग संघटनेकडून भारताच्या कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई झाली असती. या वर्षी ऑलिम्पिक होणार आहे. यामुळे भारताने पुढील धोके ओळखून पाक खेळाडूंचा व्हिसा मंजूर केला आहे.
दरम्यान पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा संघ प्रथमच कोणत्याही क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी भारतात येत आहे.
हेही वाचा -
उसेन बोल्ट पेक्षाही वेगवान..! ९.५५ सेकंदात १०० मीटर अंतर पार, सोशल मीडियावर 'त्याची'च चर्चा
हेही वाचा -