ETV Bharat / sports

Asian Rowing Championship : थायलंडमध्ये भारताने जिंकले सुवर्ण व रौप्य पदक - Parminder Singh

थायलंडमध्ये आयोजित एशियन रोईंग चँपियनशिप 2021 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. अर्जुन लाल जाट आणि रवि या पुरुष डबल्स जोडीने शनिवारी एशियन रोईंग चँपियनशिप 2021 मध्ये सुवर्ण पदक तर परमिंदर सिंह याने सिंगल स्कल्समध्ये रौप्य पदक जिंकले.

Asian Rowing Championship
Asian Rowing Championship
author img

By

Published : Dec 11, 2021, 8:44 PM IST

रेयोंग (थायलंड) - अर्जुन लाल जाट आणि रवि या पुरुष डबल्स जोडीने शनिवारी एशियन रोईंग चँपियनशिप 2021 मध्ये सुवर्ण पदक तर परमिंदर सिंह याने सिंगल स्कल्समध्ये रौप्य पदक जिंकले. अर्जून लाल टोकियो ऑलिम्पिक मध्ये 11 व्या स्थानी राहिले होते.

डबल स्कल्स फायनलमध्ये भारताच्या अर्जुन लाल आणि रवी यांनी 6:57.383 मिनिट इतक्या वेळात फिनिश लाइन पार केली. त्यांनी चीनच्या झांग ली किंग व लू टिंग (7:02.357) यांच्यावर मात केली. चीन ने रौप्य पदक तर उज्बेकिस्तानच्या एम. दावरोनोव व ए. दोजरेव (7:07.734) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

परमिंदर सिंह उज्बेकिस्तानच्या शाखबोज खुलमुरजेव नंतर 8:07.323 अंकांनी पुरुषांच्या एकल स्कल्समध्ये रौप्य पदक जिंकून दुसऱ्या स्थानावर राहिले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील परमिंदर सिंह यांचे हे पहिलेच पदक आहे. उज्बेकिस्तान रोवर शाखबोज खुलमुरजेव याने 7:56.307 वेळ घेऊन सुवर्ण पदक जिंकले. इंडोनेशियाच्या मेमोला कांस्य पदक मिळाले.

भारताचे अरविंद सिंह यांच्याकडून लाइटवेट सिंगल स्कल्स आणि पुरुषांच्या कॉक्सलेस क्वाड्रपल स्कल्समध्ये पदकाची आशा आहे. रविवारी अंतिम सामना होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.