ETV Bharat / sports

Asian Games 2023 : मराठमोळ्या अविनाशची 'गोल्डन' कामगिरी; 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक

Asian Games २०२३ : लांब पल्ल्याचा मराठमोळा धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याने एशियन गेम्सच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

Etv Bharat
अविनाश साबळे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 6:24 PM IST

Updated : Oct 1, 2023, 7:48 PM IST

मुंबई/बीड : Asian Games २०२३ : अविनाश साबळे हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. अविनाशच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. अविनाशच्या 'सुवर्ण' कामगिरीनंतर (Avinash Sable wins Gold Medal) आता भारताच्या खात्यात सुवर्ण पदकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

  • भारतीय धावपटू अविनाश साबळेने चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस विभागात स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

    अविनाश, तुझ्या ऐतिहासिक विजयाचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला सार्थ अभिमान आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.… pic.twitter.com/9uALMOZfxn

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कॉमनवेल्थ गेम्समध्येसुद्धा दमदार कामगिरी : आशियाई क्रीडा स्पर्धेत बीडचा सुपुत्र असलेला अविनाश साबळे याने स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय. यामुळं भारताचं दिवसभरातील हे दुसरं सुवर्णपदक आहे. अविनाश साबळे यानं याआधी कॉमनवेल्थ गेम्समध्येसुद्धा दमदार कामगिरी केली होती. त्यामुळं आता अविनाशवर कौतुकांचा वर्षाव होताोय.

अविनाश 'अर्जुन पुरस्कारा'नं सन्मानित : ऑलिम्पियन धावपटू अविनाश साबळेला (Avinash Sable Arjuna Award)) क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) 2022 मध्ये जाहीर झाला होता. 30 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रपतीच्या हस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अविनाश हा बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा रहिवासी आहे.

Avinash Sable
अविनाश साबळे

शेती कामासाठी वडिलांना करतो मदत : अविनाश हा शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळं तो नेहमी आपल्या वडिलांना शेती कामात मदत करतो. कोरोना काळात अविनाशला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आपण पुन्हा धावू शकतो की नाही, या मानसिक चक्रात तो अडकला होता. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अविनाश पुन्हा कोरोना आजारातून बाहेर आला आणि त्यानं पुन्हा धावायला सुरुवात केली. त्यानंतर मेहनतीच्या जोरावर अविनाशनं राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला अनेक पदकं जिंकून दिली आहेत.

Avinash Sable
अविनाश साबळे

तजिंदरपाल सिंगची सुवर्ण कामगिरी : आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉटपुटमध्ये भारताच्या तजिंदरपाल सिंग तूरने देखील सुवर्णपदक पटकावलंय. त्यानं सहाव्या प्रयत्नात 20.36 मीटर थ्रोसह सुवर्णपदकावर नाव कोरलंय. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताच्या पदकांमध्ये मोठी भर पडली. आतापर्यंत विविध खेळांमध्ये जवळपास 50 पदकं भारताला मिळाली आहेत..

हेही वाचा -

  1. Asian Games २०२३ : 'गोल्डन बॉय' निरज चोप्रा या वर्षीही करणार 'सुवर्ण' कामगिरी, काकानं व्यक्त केला आशावाद
  2. Rinku Singh Story : क्रिकेटपटू रिंकू सिंहचे कुटुंब राहते एका खोलीत, मुलाच्या यशानंतर आई भावूक, म्हणाली...
  3. Asian Games 2023 : हॉकीत भारतानं पाकिस्तानला धुतलं, नोंदवला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

Last Updated : Oct 1, 2023, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.