कोलकाता - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला तिरंदाज प्रवीण जाधव याच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रवीण जाधवचे कुटुंबीय त्यांच्या घराची दुरुस्ती करू इच्छित आहेत. तर याकामी शेजाऱ्याकडून धमकी देत अडथळा निर्माण केला जात आहे.
प्रवीण जाधव सातारा जिल्ह्यातील सारडे येथे राहतो. त्याचे कुटुंबीय घराची दुरुस्ती करू इच्छित आहेत. पण घराची दुरुस्ती करू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी प्रवीणच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून देण्यात आली.
प्रवीणच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणने यासंबंधी प्रसारमाध्यमांना कळवले की, 5 ते 6 जणांनी सकाळी माझ्या घरात प्रवेश करत कुटुंबीयांना घराची दुरुस्ती करू नये, असे बजावले. यापूर्वीही अनेकदा त्यांनी माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला आहे. मात्र यावेळी त्यांनी जीवितहानी करण्याची धमकी दिल्यामुळे मला यासंबंधी अधिकृत तक्रार नोंदवावी लागत आहे. आमच्या घराची दुरुस्ती रोखण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही.
माझे कुटुंबीय या विषयावरुन अडचणीत आहेत. त्यात मी तिथे नाहीये. मी ही सर्व माहिती सेनेच्या अधिकाऱ्यांना दिली असल्याचे देखील प्रवीण म्हणाला. सातारा जिल्ह्याचे एसपी अजय कुमार बन्सल यांनी जाधव कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवीण जाधवला पदक जिंकता आलं नाही. पण तिची कामगिरी उल्लेखणीय ठरली. प्रवीण टोकियोतून माघारी परतल्यानंतर थेट हरयाणा येथे रवाना झाला. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेसाठी हरयाणात भारतीय खेळाडूंचे सराव शिबीर होणार आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : सुवर्ण स्वप्नभंग, भारतीय हॉकी संघाचा बेल्जियमकडून पराभव
हेही वाचा - Tokyo Olympics : बेल्जियमकडून पराभवानंतर खेळाडू गुरूजंत सिंगच्या कुटुंबीयांना आश्रू अनावर