मुंबई - भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने चिली हॉकी दौऱ्यातील विजयाची मालिका कायम राखली. भारताने प्रिन्स ऑफ वेल्स कंट्री क्लबवर झालेल्या सामन्यात चिलीच्या वरिष्ठ संघावर २-० अशी मात केली. भारतीय संघाचा चिली दौऱ्यातील हा पाचवा सामना होता. यात भारतीय संघाने चार विजय मिळवले. तर एक सामना अनिर्णित राखला.
चिलीच्या वरिष्ठ संघाने पहिल्या तीन सत्रात कडवी झुंज दिली. पण अखेरच्या सत्रात भारतीय संघाने दोन गोल करत विजय साकारला. संगिता कुमारी (४८ व्या मिनिटाला) आणि सुषमा कुमारी (५६व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सत्रात भारतीय संघ दबावात पाहायला मिळाला. यात भारतीय संघाने चूका करत विरोधी संघाला दोन पेनल्टी कॉर्नर दिल्या. पण यात ते गोल करू शकले नाहीत. अखेरच्या सत्रात भारतीय संघाने आपला खेळ उंचावत विजय साकारला.
हेही वाचा - सर्वोत्तम कर्णधार कोण ? कोहली की रहाणे, टी नटराजन म्हणतो..
हेही वाचा - Sri Lanka vs England : अँडरसन एक्सप्रेस सुसाट, ग्लेन मॅग्राथला टाकले मागे