ETV Bharat / sports

हॉकी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा सलग दुसरा पराभव - 2nd match

भारतासाठी निळकंठ शर्मा आणि रुपिंदर पाल सिंग यांनी १-१ गोल केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा सलग दुसरा पराभव
author img

By

Published : May 17, 2019, 9:07 PM IST

पर्थ - भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर सलग दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ५-२ ने विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियासाठी ट्रेंट मिटन २ तर फ्लान ओगलिवे, ब्लेक गोवर्स आणि टिम ब्रांडने प्रत्येकी १ गोल करत संघाला विजय मिळवून दिला. भारतासाठी निळकंठ शर्मा आणि रुपिंदर पाल सिंग यांनी १-१ गोल केला. या सामन्यासह भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे.

यापूर्वी खेळल्या गेलेल्या पश्चिम ऑस्ट्रेलिया थंडरस्टिक्सविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात भारताला विजय मिळवता आला होता. तर दुसरा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया 'अ'विरुद्धच्या सामन्यातही भारताने ३-० ने विजय मिळवला होता. मात्र ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध भारताला आपली विजयी लय कायम राखता आली नसल्याने दोन्ही सामन्यांमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. यापूर्वी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ०-४ ने पराभव केला होता.

Intro:Body:

sports 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.