क्रेफेल्ड (जर्मनी) - भारतीय पुरूष हॉकी संघाने मंगळवारी झालेल्या सामन्यात जर्मनीला बरोबरीत रोखले. भारताने पहिला सामना ६-१ ने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना १-१ अशा बरोबरीत राहिला.
जरमनप्रीत सिंहने १४व्या मिनिटाला गोल करत भारताला पहिल्या सत्रात १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनचीच्या मार्टिन हानेर याने २९व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला.
दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ करण्यास प्राधान्य दिले. यामुळे दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. अखेरीस सामना १-१ अशा बरोबरीत सुटला.
असा जिंकला भारतीय संघाने पहिला सामना...
पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत जर्मनीच्या बचावफळीवर दडपण आणले. १३व्या मिनिटाला भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर निळकंठ शर्माने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. तेव्हा पुढच्याच मिनिटाला कॉन्टन्टिन स्टेइबने जर्मनीला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
दुसऱ्या सत्रात विवेकने लागोपाठ दोन गोल करत भारताला ३-१ असे आघाडीवर आणले. सागरने २७व्या आणि २८व्या मिनिटाला गोल केलं. तिसऱ्या सत्रात जर्मनीने सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण पी.आर. श्रीजेशच्या भक्कम बचावासमोर त्यांना एकही गोल करता आला नाही.
ललित कुमार उपाध्यायने ४१व्या मिनिटाला तर आकाशदीप सिंगने ४२व्या मिनिटाला आणि हरमनप्रीत सिंगने ४७व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. भारताने हा सामना ६-१ अशा फरकाने जिंकला.
हेही वाचा - भारताने जर्मनीचा ६-१ ने उडवला धुव्वा
हेही वाचा - महिला हॉकी : जर्मनी दौऱ्यात भारताचा सलग दुसरा पराभव