इपोह - सुल्तान अझलन शाह चषकात भारतीय हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत तिसरा विजय मिळवला. स्पर्धेतील आज झालेल्या चौथ्या सामन्यात भारताच्या संघाने कॅनडावर ७-३ ने मोठा विजय साजरा केला. या सामन्यात मनदीप सिंगने हॅट्रिक साजरी केली. तर वरुण, अमित, विवेक आणि निलकांता या खेळाडूंनी प्रत्येकी एक गोल करत भारताला मोठा विजय मिळवून दिला .
India put up a feisty performance in their 4th encounter of the 28th Sultan Azlan Shah Cup 2019, to win by a whopping scoreline of 7-3 against Canada. Here are some images from the exciting clash on 27th March.
— Hockey India (@TheHockeyIndia) March 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
For more images: https://t.co/NaWDrbC5xc#IndiaKaGame pic.twitter.com/upfoEIxAfx
">India put up a feisty performance in their 4th encounter of the 28th Sultan Azlan Shah Cup 2019, to win by a whopping scoreline of 7-3 against Canada. Here are some images from the exciting clash on 27th March.
— Hockey India (@TheHockeyIndia) March 27, 2019
For more images: https://t.co/NaWDrbC5xc#IndiaKaGame pic.twitter.com/upfoEIxAfxIndia put up a feisty performance in their 4th encounter of the 28th Sultan Azlan Shah Cup 2019, to win by a whopping scoreline of 7-3 against Canada. Here are some images from the exciting clash on 27th March.
— Hockey India (@TheHockeyIndia) March 27, 2019
For more images: https://t.co/NaWDrbC5xc#IndiaKaGame pic.twitter.com/upfoEIxAfx
कॅनडावर मिळवलेल्या विजयामुळे भारताने गुणतक्त्यात १० गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात भारताने विजय मिळवला, तर १ सामना बरोबरीत सोडवला आहे.
भारताने या स्पर्धेत आतापर्यंत जपानला २-० ने, मलेशियाला ४-२ ने तर आज कॅनडाला ७-३ ने पराभूत केले आहे. तर २४ मार्चला कोरीयाविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात बरोबरीत सोडवला होता. भारतीय संघाचा पुढील सामना २९ मार्चला पोलंडसोबत होणार आहे.