नवी दिल्ली - फुटबॉलविश्वात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे दोन दिग्गज खेळाडू मानले जातात. त्यांच्या मैदानावरील द्वंद्वाची चर्चा नेहमीच रंगत असते. या दोघांत सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण हे सांगणे खरच कठीण आहे. एका कार्यक्रमादरम्यान हे दोन्ही खेळाडू एकत्र आले. तेव्हा रोनाल्डोने मेस्सीसोबत जेवणाची इच्छा व्यक्त केली.
यूएफा पुरस्कारादरम्यान हो दोन दिग्गज एकत्र आले. या कार्यक्रमाला दोन्ही खेळाडू शेजारी बसले होते. तेव्हा रोनाल्डोने मेस्सीसोबत जेवणाची इच्छा व्यक्त केली. रोनाल्डो म्हणाला, '१५ वर्षांपर्यंत आम्ही व्यासपीठ सांभाळले आहे. फुटबॉलविश्वात असे कधी घडले नव्हते. आमच्यात चांगले संबंध आहेत. आम्ही कधी एकत्र जेवलो नाही. पण, भविष्यात आम्ही एकत्र जेवण्याचा बेत करू.'
-
🗣️ "It's good to be a part of the history of football"—Ronaldo on his rivalry with Messi in Spain pic.twitter.com/OxkjFs7KiU
— B/R Football (@brfootball) August 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🗣️ "It's good to be a part of the history of football"—Ronaldo on his rivalry with Messi in Spain pic.twitter.com/OxkjFs7KiU
— B/R Football (@brfootball) August 29, 2019🗣️ "It's good to be a part of the history of football"—Ronaldo on his rivalry with Messi in Spain pic.twitter.com/OxkjFs7KiU
— B/R Football (@brfootball) August 29, 2019
२०१८-१९ मध्ये मेस्सीला सर्वाधिक गोल करण्यासाठी पुरस्कार मिळाला आहे. तर, लिवरपुल संघाचा गोलकीपर एलिसन बेकरला सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार मिळाला. याच संघाचा बचावपटू वर्जिल वेन डाइकला यंदाचा यूएफा प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. मेस्सी आणि रोनाल्डो यांनी मागच्या आठपैकी पाचवेळा हा पुरस्कार पटकावला होता.