टोकियो - स्पेनचा दिग्गज स्ट्राईकर फर्नाडो टॉरेसने फुलबॉलपासून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर टॉरेसने कोचच्या भूमिकेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तसेच टॉरेस भविष्यात संघाचा मॅनेजर होण्यासाठी इच्छुक आहे.
फर्नाडो टॉरेस जपानच्या सेगान तोसू क्लबकडून सध्या खेळत असून, २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विसेल कोबे क्लब विरोधात तो आपला अंतिम व्यावसायिक सामना खेळणार आहे. टॉरेसने आपल्या १८ वर्षाच्या कार्यकीर्दीत व्यावसायिक करियरमध्ये एटलेटिको मद्रिद, लिवरपूल, चेल्सी आणि एसी मिलानच्या क्लबकडून मैदानात उतरला होता. टॉरेस २०१० फीफा विश्वकप स्पर्धेत विजय मिळवलेल्या स्पेनच्या संघाचा सदस्य होता. तसेच त्याने २००८ च्या युरो कपमध्ये जर्मनी विरुध्द गोल करत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
टॉरेसने मागील वर्षीच्या जुलै महिन्यात जपानच्या क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, टॉरेसने फुलबॉलपासून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.