ETV Bharat / sports

जगभरातील ५० दिग्गज फुटबॉलपटूंची ‘मानवते’च्या नायकांना मानवंदना - thanks medical staff by fifa news

“जगभरातील कर्मचारी, स्वयंसेवक आणि वैद्यकीय कर्मचारी मानवतेच्या सेवेसाठी दररोज आपला जीव धोक्यात घालत आहेत,” अशी माहिती वृत्तसंस्था सिन्हुआने फिफाच्या हवाल्याने दिली आहे. व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे, की काहींनी मोठी किंमत मोजली आहे. कायदा, मेडिकल, दुकाने, कोठारे, वितरण सेवा, सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षा यात गुंतलेले कर्मचारी आपले जीवन वाचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. सर्व मानवजातीच्या या नायकांना फुटबॉल समर्थन करतो.

50 footballers including pele, maradona thanks medical staff
जगभरातील ५० दिग्गज फुटबॉलपटूंची ‘मानवतेच्या’ नायकांना मानवंदना
author img

By

Published : Apr 19, 2020, 9:21 PM IST

ब्राझील - पेले, मॅराडोना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासह जगभरातील जवळपास ५० फुटबॉलपटूंनी कोरोना व्हायरसविरूद्ध युद्ध लढणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत. फुटबॉलची जागतिक नियामक संस्था फिफाने दीड मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये या दिग्गज फुटबॉलपटूंनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानवतेचे नायक म्हटले आहे.

“जगभरातील कर्मचारी, स्वयंसेवक आणि वैद्यकीय कर्मचारी मानवतेच्या सेवेसाठी दररोज आपला जीव धोक्यात घालत आहेत,” अशी माहिती वृत्तसंस्था सिन्हुआने फिफाच्या हवाल्याने दिली आहे. व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे, की काहींनी मोठी किंमत मोजली आहे. कायदा, मेडिकल, दुकाने, कोठारे, वितरण सेवा, सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षा यात गुंतलेले कर्मचारी आपले जीवन वाचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. सर्व मानवजातीच्या या नायकांना फुटबॉल समर्थन करतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या व्हिडिओमध्ये पेले, मॅराडोना आणि रोनाल्डो व्यतिरिक्त डेव्हिड बेकहम, ग्यानलुइगी बफन, काफू, फॅबिओ केनवारो, इकर कॅलिस, झिनेडिन जिदान, कार्लाय लेओड आणि मटारा हे फुटबॉलपटू दिसत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.