ETV Bharat / sports

'हे' दोन भारतीय खेळाडू न्यूझीलंडवर पडतील भारी, डेव्हिड वॉर्नरचे भाकित - जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना २०२१

डेव्हिड वॉर्नरने एका मुलाखतीत सांगितलं की, भारताने रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनीही अंतिम सामन्यात खेळावावं.

wtc-final-david-warner-backs-ravindra-jadeja-to-be-part-of-india-xi
'हे' दोन भारतीय खेळाडू न्यूझीलंडवर पडतील भारी, डेव्हिड वॉर्नरचे भाकित
author img

By

Published : Jun 14, 2021, 5:05 PM IST

मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी दिग्गज खेळाडू त्यांचा अंदाज व्यक्त करत आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरची भर पडली आहे. वॉर्नरने अंतिम सामन्याविषयी भाकित वर्तवलं आहे. तसेच त्याने भारतीय संघ कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरलं पाहिजे, याविषयी एक सल्ला दिला आहे.

डेव्हिड वॉर्नरने एका मुलाखतीत सांगितलं की, भारताने रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनीही अंतिम सामन्यात खेळावावं. तो पुढे म्हणाला, डावखुरा फिरकीपटू जडेजा एका विशिष्ट उंचीने सातत्याने गोलंदाजी करु शकतो. जडेजाने डावखुऱ्या फलंदाजांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केलेली आहे. जडेजा आणि अश्विन हे दोन्ही फिरकीपटू न्यूझीलंडवर भारी पडतील, असे मला वाटते.

वॉर्नरने सांगितल्याप्रमाणे भारतीय संघाचे संतुलन राखण्यासाठी रविंद्र जडेजा आणि अश्विन या दोघांचा सहभाग निश्चित मानला जात आहे. कारण गोलंदाजी प्रमाणेच हे दोघेही फलंदाजीमध्येही योगदान देण्यात सक्षम आहे. परंतु, साऊथम्पटनचे पिच क्युरेटर सिमोन ली यांनी अंतिम सामन्यासाठी उसळी आणि वेगवान गोलंदाजीला साथ देणारी अशी खेळपट्टी तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे भारतीय संघ अंतिम सामन्यात कोणत्या गोलंदाजांसह मैदानात उतरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघही अंतिम सामन्यात ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - क्युरेटरने सांगितलं WTC Final साठी कशी असणार खेळपट्टी

हेही वाचा - विनू मांकड, संगकारासह १० खेळाडूंना ICC Hall of Fame मध्ये स्थान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.