साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटनमध्ये खेळला जात असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. पावसामुळे पहिला आणि चौथा दिवस वाया गेला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसी अंधूक प्रकाशांमुळे कमी षटके खेळवण्यात आली. आज पाचव्या दिवशी देखील सामन्याला उशिरा सुरूवात झाली. जसप्रीत बुमराहने आज पहिले षटके फेकले. पण, हे षटक पूर्ण झाल्यानंतर तो ड्रेसिंग रुमकडे धावत सुटला. यामुळे सुरूवातीला नेमकं काय झालं हे काही कळालं नाही. पण बुमराहने केलेली चूक नंतर समोर आली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह चुकीची जर्सी घालून मैदानात उतरला होता. एक षटक फेकल्यानंतर बुमराहला त्याची चूक कळली. तेव्हा तो पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि जर्सी बदलून आला. बुमराहने भारतीय संघाची नेहमीची कसोटी क्रिकेटची जर्सी घातली, ज्यात स्पॉन्सरचे नाव होते. पण अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला वेगळी जर्सी देण्यात आली आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये जर्सीचे नियम वेगवेगळे असतात. आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येक संघाला जी जर्सी दिली जाते त्याच्या छातीवर देशाचं नाव असते. पण नेहमीच्या कसोटी क्रिकेटमध्ये जर्सीच्या छातीवर स्पॉन्सर असतो. आयसीसी स्पर्धेमध्ये मात्र जर्सीवर स्पॉन्सरचे नाव डाव्या किंवा उजव्या हाताच्या दंडावर असते.
हेही वाचा - कोरोनामुळे २ वेळा लग्न पुढं ढकललं, पट्ट्याने अखेरीस गुपचूप उरकला विवाह
हेही वाचा - सायनाची पतीसह ताजमहलला भेट, डायना बेंचवर बसून फोटोसेशन