ETV Bharat / sports

Womens T20 WC Prize Money : ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस; वर्ल्डकप जिंकण्यासाठी मिळाली मोठी रक्कम - महिला टी20 वर्ल्डकप 2023 अवार्ड

महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेत सहाव्यांदा चॅम्पियन बनलेल्या ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. जेतेपद जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाला किती बक्षीस मिळाले हे तुम्हाला माहिती आहे का?

Womens T20 WC Prize Money
ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस
author img

By

Published : Feb 27, 2023, 2:48 PM IST

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-20 विश्वचषक 2023 च्या 8 व्या हंगामात विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा जिंकून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा हॅटट्रिक केली आहे. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस पडला. महिला T20 विश्वचषक पुरस्कार मिळाल्याने संघातील सर्व खेळाडूंनी आनंदाने उड्या मारल्या. खेळाडूंनी मैदानावरच विजयाचा आनंद साजरा केला. सहाव्यांदा चॅम्पियन बनलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला ICC महिला T20 विश्वचषक ट्रॉफी आणि 8.27 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. इतकी बक्षीस रक्कम मिळाल्यानंतर संघातील सर्व खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही.

महिला टी-20 विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा : 2023 च्या या स्पर्धेतही कांगारूंना कोणीही हरवू शकले नाही, अशा पद्धतीने ऑस्ट्रेलियाने महिला टी-20 विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला आहे. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 6 वेळा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर विजयानंतर मिळालेल्या 8.27 कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेने ऑस्ट्रेलिया संघाला धनवान बनवले आहे. T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या यजमान दक्षिण आफ्रिकेला 4.13 कोटी रुपयांचे दुसरे बक्षीस देण्यात आले आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आणि इंग्लंडला १.७३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

157 धावांचे लक्ष्य : महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला 157 धावांचे लक्ष्य दिले होते. पण लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 137 धावांवर गारद झाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने 53 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार ठोकत 74 धावांची तुफानी खेळी केली. मुनीच्या या मॅच-विनिंग इनिंगच्या जोरावर टीमने मजबूत धावसंख्या गाठली आणि टी-20 वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आणि सहाव्यांदा चॅम्पियन बनला.

अंतिम फेरीत धडक : ऑस्ट्रेलियाने 7व्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने या विश्वचषकाच्या मोसमात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. यासह कांगारू संघाने सलग 7व्यांदा टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दरम्यान ती फक्त एकदाच हरली आहे. मात्र आता 7व्या अंतिम फेरीत ती विजेतेपद पटकावण्याच्या प्रबळ इराद्याने मैदानात उतरणार आहे. गोलंदाज मेगन शुट याशिवाय ॲलिसा हिली आणि मेग लॅनिंग हे त्यांचे फलंदाज हे ऑस्ट्रेलियाचे बलस्थान आहे. अ‍ॅलिसा हिलीने 119 च्या स्ट्राईक रेटने या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 171 धावा केल्या आहेत. तर मेग लॅनिंगने 115 च्या स्ट्राईक रेटने 139 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शुटने सर्वाधिक 9 विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी १२ आहे आणि इकॉनॉमी रेट ६.२२ आहे.

हेही वाचा : Harmanpreet Kaur : मुंबई इंडियन्सने हरमनप्रीतला बनवले कर्णधार; केले जल्लोषात स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.