ETV Bharat / sports

IND vs WI 2nd T-20 : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात आज दुसरा टी-20 सामना ; भारताला मालिका जिंकण्याची संधी - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा टी-20 सामना

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India vs West Indies ) संघात टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी-20 सामना आज (शुक्रवार) खेळला जाणार आहे. भारताला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.

IND vs WI
IND vs WI
author img

By

Published : Feb 18, 2022, 12:28 PM IST

कोलकाता : सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर ( West Indies tour of India ) आहे. या दौऱ्यातील आता तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना पार पडला आहे. हा सामना भारतीय संघाने 6 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (शुक्रवारी) खेळला जाणार आहे.

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्डच्या ( Kieron Pollard Captain of West Indies )नेतृत्वाखाली मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

चाहत्यांसाठी महत्वाच्या गोष्टी -

  • भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (18 फेब्रुवारी) होणार आहे.
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर ( Eden Gardens Cricket Stadium ) खेळवला जाणार आहे.
  • भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
  • तसेच हा सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजे ठीक साडेसहाला नाणेफेक होईल.
  • तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना पाहू शकता.
  • तसेच लाइव स्ट्रीमिंगचा डिस्ने हॉटस्टारवर या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

भारतीय संघ ( Indian team ) :

इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, दीपक हूडा, आवेश खान, ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई.

वेस्ट इंडिज संघ ( West Indies team ) :

ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, फॅबियन ऍलन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, डॅरेन ब्राव्हो, शाई होप, रोस्टन चेस आणि हेडन वॉल्श.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.