ETV Bharat / sports

IND vs WI T20 Series : वाशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून बाहेर

भारतीय संघाचा ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर ( Off-spinner Washington Sundar Injury ) वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.

author img

By

Published : Feb 15, 2022, 3:45 PM IST

Washington Sundar
Washington Sundar

कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India vs West Indies ) यांच्यात 16 फेब्रुवारी पासून कोलकाता येथे तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या अगोदर ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर याच्या पायाच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने, तो वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी- 20 मालिकेतून बाहेर ( Washington sundar out of T20 series ) पडला आहे.

वॉशिंग्टनने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी दुखापतीतून यशस्वी पुनरागमन केले होते. तसेच बुधवारपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत शानदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करणार होता.

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या एका अनुभवी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "वॉशिंग्टनच्या पायाच्या मांसपेशी ताणल्या गेल्या ( Washington leg muscles were stretched ) आहेत. त्यामुळे त्याने आज सराव केला नाही. असे दिसते आहे की, तो फक्त पाच दिवसांत सुरु होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासठी सक्षम असणार नाही.

इंग्लंड दौऱ्यात हाताला झालेल्या दुखापतीमुळे वॉशिंग्टन ( Washington injured his hand England tour ) बराच काळ भारतीय संघातून बाहेर होता. त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीसह स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला होता. वॉशिंग्टनची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. परंतु त्याची COVID-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या मालिकेत तो खेळू शकला नाही.

अक्षर पटेल दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर आहे आणि आता वॉशिंग्टन देखील बाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत संघात मुख्य फिरकीपटू म्हणून फक्त युजवेंद्र चहल आहे. पंजाबचा डावखुरा फिरकी गोलंदाज हरप्रीत ब्रारचा ( Punjab left-arm spinner Harpreet Brar ) पर्याय म्हणून समावेश करण्यात येऊ शकतो. कारण तो संघासोबत प्रवास करत आहे. वॉशिंग्टन आता अक्षर आणि लोकेश राहुल यांच्यासह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन मधून जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.