कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( India vs West Indies ) संघात 16 फेब्रुवारीपासून टी- 20 सामन्यांची मालिका खेळली जाणार (T20 series starts February 16 ) आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ कोलकाता येथे दाखल झाले आहेत. या मालिकेत तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. मागील काही काळापासून विराट कोहली मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्या अगोदर सोमवारी नेटमध्ये ( Virat Kohli practice in the net ) कसून सराव केला आहे.
-
A sneak peek into #TeamIndia's fielding drill at the Eden Gardens. 👀 👌#INDvWI | @Paytm pic.twitter.com/wSFH4keVTx
— BCCI (@BCCI) February 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A sneak peek into #TeamIndia's fielding drill at the Eden Gardens. 👀 👌#INDvWI | @Paytm pic.twitter.com/wSFH4keVTx
— BCCI (@BCCI) February 15, 2022A sneak peek into #TeamIndia's fielding drill at the Eden Gardens. 👀 👌#INDvWI | @Paytm pic.twitter.com/wSFH4keVTx
— BCCI (@BCCI) February 15, 2022
या सराव सत्रात सर्वात अगोदर विराट कोहली आला होता. त्याने भारताच्या सपोर्ट स्टाफसोबत थ्रो-डाउनचा सराव ( Virat Kohli throw-down practice ) केला. त्यानंतर त्याने 45 मिनिटे नेटमध्ये जास्त वेळ फलंदाजी केली.
- — BCCI (@BCCI) February 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— BCCI (@BCCI) February 14, 2022
">— BCCI (@BCCI) February 14, 2022
या दरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड क्युरेटर सुजान मुखर्जी यांच्याशी बराच वेळ संभाषण करताना दिसले. ऑगस्ट 2019 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये कोहलीने शेवटचे शतक झळकावले ( Virat Kohli last century against WI ) होते. यानंतर त्याने 10 अर्धशतके झळकावली पण त्याचे शतकात रूपांतर करण्यात अपयश आले.
सर्व फॉरमॅटबद्दल बोलायचे तर कोहलीने दोन वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलेले नाही. त्याने त्याचे शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध ईडन गार्डन्सवर ( Virat Kohli last century in 2019 ) खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात झळकावले होते.