मुंबई - भारताचे महान क्रिकेटपटू विनू मांकड, श्रीलंकेचा माजी डावखुरा फलंदाज कुमार संगकारा आणि झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांच्यासह दहा दिग्गजांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल विनू मांकड यांना आयसीसीने सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान दिले आहे.
अशी आहे विनू मांकड यांची कारकिर्द -
विनू मांकड यांनी भारतासाठी ४४ कसोटी सामने खेळली. यात त्यांनी ३१.४७ च्या सरासरीने २ हजार १०९ धावा केल्या. याशिवाय त्यांनी गोलंदाजीत १६२ गडी बाद केले.
श्रीलंका क्रिकेटमध्ये संगकाराचे नाव आदराने घेतले जाते. कारण तो श्रीलंकेसाठी हुकमी एक्का ठरला आहे. त्याने श्रीलंकेसाठी १४४ कसोटी सामने खेळली आहे. यात त्याने ५७.४० च्या सरासरीने १२ हजार ४०० धावा झोडपल्या. यात ३८ शतके आणि ५२ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने यष्टीरक्षण करताना १८२ कॅच घेतले आणि २० स्टंपिंग्स केले.
हेही वाचा - 'या' तारखेपासून सुरू होणार आयपीएलचे उर्वरित सामने, अंतिम सामना १५ ऑक्टोबरला
हेही वाचा - नोवाक जोकोव्हिचने पटकावलं फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद