ETV Bharat / sports

RCB Twitter Hacked : आरसीबीचे ट्विटर हँडल हॅक! NFT संबंधित ट्विट केले पोस्ट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ट्विटर अकाउंट आज पहाटे 4 च्या सुमारास हॅकर्सनी हॅक केले. संघाने त्यांच्या ट्विटर अकाउंट हॅकची माहिती एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. हॅकरने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून 'Board Ape Yacht Club' असे केले.

RCB
आरसीबी
author img

By

Published : Jan 21, 2023, 2:27 PM IST

बेंगळुरु : आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे ट्विटर हँडल शनिवारी सकाळी हॅक झाले. हॅकर्सनी टीमच्या ट्विटर हँडलच्या चित्रासह डाव्या बाजूला बदल केले आहेत. अकाउंट हॅक झाल्यानंतर सोशल मीडियावर काही काळ खळबळ उडाली होती. यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. आता संघाने त्यांचे खाते पुन्हा मिळवले केले असून हँडलचे नाव आणि बायो पूर्वीप्रमाणे करण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली माहिती : हॅकरने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून 'Board Ape Yacht Club' असे केले. तर डावीकडे 'Buy a bored app or mutant app on OpenSea to become a member' असे लिहिले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सोशल टीमने त्यांच्या ट्विटर अकाउंट हॅकची माहिती एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. त्यादरम्यान त्यांनी त्यांच्या चाहत्यांची माफीही मागितली. आरसीबीचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

या आधी देखील झाले होते हॅक : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ट्विटर अकाउंट आज पहाटे 4 च्या सुमारास हॅकर्सनी हॅक केले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक प्रमोशनल व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या नंतर त्यांच्या ट्विटर अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली. फाफ डुप्लेसीच्या नेतृत्वाखालील या टीमचे ट्विटर अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी सप्टेंबर 2021 मध्येही टीमचे अकाउंट हॅक झाले होते. त्यावेळीही संघाला काही वेळाने खाते पूर्ववत करण्यात यश आले होते.

हेही वाचा : IND Vs NZ ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड.. नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.