सिडनी - बिग बॅश लीग (बीबीएल) च्या आगामी हंगामासाठी सिडनी सिक्सर्सने इंग्लंडचा फलंदाज जेम्स विन्सशी करार केला आहे. इंग्लंडच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य असलेला विन्स सलग तिसर्या सत्रात या संघात सामील होईल.
''बीबीएल-८च्या उत्तरार्धात आपल्या देशाचा जो डेन्लीची जागा घेणारा विन्स पहिल्या क्रमांकासाठी संघात उपयुक्त ठरला होता. विन्स आमच्या विजयी संघाचा एक महत्त्वाचा भाग होता. आपला बीबीएल प्रवास सुरू ठेवण्यासाठी आम्ही त्याचे स्वागत करतो. त्याने अव्वल क्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि आमच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले", असे संघाचे प्रशिक्षक ग्रेग शिफफर्ड यांनी सांगितले आहे.
-
✍️ SIGNING NEWS! @vincey14 will back back in magenta for @BBL|10 🙌
— Sydney Sixers (@SixersBBL) October 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details > https://t.co/Peiq8fYyRw#smashemsixers #BBL10 pic.twitter.com/Unot9RdgM5
">✍️ SIGNING NEWS! @vincey14 will back back in magenta for @BBL|10 🙌
— Sydney Sixers (@SixersBBL) October 30, 2020
Details > https://t.co/Peiq8fYyRw#smashemsixers #BBL10 pic.twitter.com/Unot9RdgM5✍️ SIGNING NEWS! @vincey14 will back back in magenta for @BBL|10 🙌
— Sydney Sixers (@SixersBBL) October 30, 2020
Details > https://t.co/Peiq8fYyRw#smashemsixers #BBL10 pic.twitter.com/Unot9RdgM5
जेम्स विन्सने आतापर्यंत बीबीएलमध्ये २९ सामने खेळले आहेत आणि २८.५०च्या सरासरीने आणि १३०.६८च्या स्ट्राइक रेटने ७४१ धावा केल्या आहेत. त्याने २९ डावांमध्ये तीन अर्धशतकेही केली आहेत.