ETV Bharat / sports

IND vs SL Test Series : सुनील गावस्करांकडून रोहित शर्माच्या नेतृत्व शैलीचे कौतुक - भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट सीरीज

दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर ( Veteran player Sunil Gavaskar ) यांनी रोहित शर्माचे कौतुक करताना सांगितले की, नवीन कर्णधाराने आपल्या डावात ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये बदल, त्यामुळे पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला.

Sunil Gavaskar
Sunil Gavaskar
author img

By

Published : Mar 7, 2022, 7:04 PM IST

मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 1 डाव आणि 222 धावांनी श्रीलंकेवर मात ( SL lost by 1st Test ) केली. त्यानंतर भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माची प्रशंसा केली आहे.

सुनील गावस्कर रोहित शर्माचे कौतुक ( Gavaskar Praised Rohit ) करताना म्हणाले, नवीन कर्णधाराने आपल्या डावात आपले क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये बदल केले, ज्यामुळे पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला. यजमानांनी श्रीलंकेचा तीन दिवसांत पराभव केला. 574/8 वर पहिला डाव घोषित केल्यानंतर भारताने श्रीलंकेला 174 आणि 178 धावांवर गुंडाळले.

सुनील गावस्कर स्टार स्पोर्टस सोबत बोलताना म्हणाले, कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माने ( Test captain Rohit Sharma ) शानदार सुरुवात केली. जेव्हा तुम्ही तीन दिवसाात सामना जिंकता, तेव्हा त्यावरुन हे स्पष्ट होते की, तुमचा संघ मजबूत आणि चांगला राहिला आहे. यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा भारत क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा गोलंदाजी मधील बदल खुप प्रभावशाली होते. झेल सुद्धा त्याच ठिकाणी जात होते, जिथे क्षेत्ररक्षक उभे होते.

गावस्कर पुढे म्हणाले, मी कर्णधार रोहित शर्माला त्याच्या नेतृत्व शैलीसाठी ( Rohit Sharma leadership style ) 10 पैकी 9.5 गुण देऊ इच्छितो. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका 1-2 अशा फरकाने पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने आपला पदभार सोडला. त्यानंतर रोहितने विराट कोहलीच्या जागी भारताचा नवीन कसोटी कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.