दुबई : सध्या श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध श्रीलंका संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका पार पडली आहे. या मालिकेत भारतीय संघाचा युवा खेळाडू श्रेयस अय्यरने ( Young player Shreyas Iyer ) शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे भारतीय संघाने श्रीलंका संघाला टी-20 मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप दिला होता. आता या मालिकेत शानदार प्रदर्शन केल्याचा फायदा श्रेयस अय्यरला आयसीसी टी-20 क्रमवारीत फायदा झाला आहे.
-
🔹 Rashid Khan breaks into top 10 ODI bowlers
— ICC (@ICC) March 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🔹 Pathum Nissanka moves to No.9 in T20I batters’ list
Full rankings ➡️ https://t.co/saWOSRZ2py pic.twitter.com/UUXbK8RDme
">🔹 Rashid Khan breaks into top 10 ODI bowlers
— ICC (@ICC) March 2, 2022
🔹 Pathum Nissanka moves to No.9 in T20I batters’ list
Full rankings ➡️ https://t.co/saWOSRZ2py pic.twitter.com/UUXbK8RDme🔹 Rashid Khan breaks into top 10 ODI bowlers
— ICC (@ICC) March 2, 2022
🔹 Pathum Nissanka moves to No.9 in T20I batters’ list
Full rankings ➡️ https://t.co/saWOSRZ2py pic.twitter.com/UUXbK8RDme
श्रेयस अय्यरला आयसीसी टी-20 क्रमवारीत 27 स्थानांचा फायदा होऊन तो 18 व्या स्थानी ( Shreyas Iyer ranked 18th ) विराजमान झाला आहे. या त्याच्या क्रमवारीवर श्रीलंके विरुद्ध टी-20 मालिकेत केलेल्या कामगिरीचा प्रभाव पडला आहे. 27 वर्षीय फलंदाज श्रेयस अय्यरने फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताच्या 3-0 च्या विजयादरम्यान तीन नाबाद अर्धशतके झळकावली होती. ज्यामध्ये श्रेयसने 174 च्या स्ट्राइक रेटने 204 धावा केल्या. त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गोलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेत 17व्या स्थानावर पोहोचला आहे.
तसेच श्रीलंकेच्या पाथुम निसांकाने ( Pathum Nisanka of Sri Lanka ) मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार 75 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला क्रमवारीत सहा स्थानांचा फायदा होऊन नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आता टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. तो पाच स्थानांनी घसरून 15व्या स्थानावर आला आहे.
या आठवड्यात टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा दुसरा मोठा मूव्हर यूएईचा मुहम्मद वसीम आहे. आयसीसी टी20 विश्वचषक पात्रता अ च्या अंतिम सामन्यात आयर्लंडविरुद्ध नाबाद शतकी खेळीमुळे त्याला 12व्या स्थानावर पोहोचण्यास मदत झाली. 2017 मध्ये शैमन अन्वरच्या 13व्या क्रमांकाच्या पुढे, कोणत्याही UAE फलंदाजाचे हे सर्वोच्च T20 क्रमवारी आहे. भारतासोबतच्या मालिकेत श्रीलंकेच्या लाहिरू कुमाराने पाच बळी घेतल्यामुळे त्याला प्रथमच पहिल्या 40गोलंदाजांमध्ये स्थान मिळाले आहे.