ETV Bharat / sports

IPL २०२१ : मुंबई नाही तर 'हा' संघ जिंकणार स्पर्धा, रवी शास्त्रींचा सूचक इशारा - दिल्ली वि. बंगळुरू सामना

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएल २०२१ चा विजेता कोण ठरणार? याबाबत सूचक इशारा दिला आहे.

Seeds being sowed for a potentially new winner to emerge, Ravi Shastri feels there will be a new champion in IPL 2021
IPL २०२१ : मुंबई नाही तर हा संघ जिंकणार स्पर्धा, रवी शास्त्रींचा सूचक इशारा
author img

By

Published : Apr 28, 2021, 3:59 PM IST

मुंबई - भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएल २०२१ चा विजेता कोण ठरणार? याबाबत सूचक इशारा दिला आहे. शास्त्री यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यानंतर हा इशारा दिला आहे.

अहमदाबादमध्ये मंगळवारी झालेला आयपीएल २०२१ मधील २२ वा सामना रंगतदार झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेने विजय साकारला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूने एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीला १७२ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या ऋषभ पंत आणि शिमरोन हेटमायरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांना अपयश आले. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १४ धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने १२ धावा देत बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या रोमांचक सामन्यानंतर रवी शास्त्री यांनी एक सूचक ट्विट करत नव्या विजेत्याबाबत इशारा केला आहे. यंदा कोणता जुना संघ नाही तर नवा संघ आयपीएलचा विजेता होईल. त्याचे बी आता पेरले गेले आहे, अशा आशयाचे ट्विट शास्त्री यांनी केले आहे.

दरम्यान, शास्त्री यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणत्याही संघाचे नाव घेतलेले नाही. परंतु त्यांचा इशारा हा दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघाकडे आहे. कारण, त्यांनी या दोन संघातील सामन्यानंतर हे ट्विट केले आहे. तसेच त्यांनी हे ट्विट करताना विराट आणि पंत या दोघांचा एकत्रित असलेला फोटो शेअर केला आहे. यावरून अंदाज बांधता येतो की, दिल्ली किंवा बंगळुरू या दोन संघापैकी एक संघ विजेता ठरेल, असे शास्त्री यांना वाटतं. आता शास्त्री यांची ही भविष्यवाणी खरी होणार का? हे ३० मे रोजी कळेल.

हेही वाचा - धोनीच्या आई वडिलांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज

हेही वाचा - IPL २०२१ Points Table : बंगळुरूने चेन्नईला दिला मोठा धक्का, पटकावले मानाचे स्थान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.