मुंबई - आयपीएल 2021 हंगामाच्या पहिल्या हाफमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात शानदार कामगिरी केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुसऱ्या हाफसाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. बंगळुरूने आपल्या संघात नव्या तीन खेळाडूंना सामिल करून घेतलं आहे. यासोबत त्यांनी मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिचच्या जागेवर माइक हेसन यांची नियुक्ती केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा आणि वेगवान गोलंदाज दुश्मंथा चमीरा यांना संघात घेतलं आहे. त्यांनी अॅडम झम्पा आणि डॅनियल सॅम्स यांच्या जागेवर हे बदल केले आहेत. याशिवाय बंगळुरूने सिंगापूर संघातील टिम डेव्हिड याला न्यूझीलंडचा फलंदाज फिन एलनच्या जागेवर स्थान दिलं आहे.
-
🔊 ANNOUNCEMENT 🔊
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 21, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We’re thrilled to welcome Sri Lankan all-rounder Wanidu Hasaranga to the RCB Family for the second leg of #IPL 2021 in UAE. He replaces Adam Zampa. #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #NowAChallenger pic.twitter.com/nEf6mtRcNt
">🔊 ANNOUNCEMENT 🔊
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 21, 2021
We’re thrilled to welcome Sri Lankan all-rounder Wanidu Hasaranga to the RCB Family for the second leg of #IPL 2021 in UAE. He replaces Adam Zampa. #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #NowAChallenger pic.twitter.com/nEf6mtRcNt🔊 ANNOUNCEMENT 🔊
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 21, 2021
We’re thrilled to welcome Sri Lankan all-rounder Wanidu Hasaranga to the RCB Family for the second leg of #IPL 2021 in UAE. He replaces Adam Zampa. #PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #NowAChallenger pic.twitter.com/nEf6mtRcNt
आयपीएल 2021च्या मध्यात बंगळुरू संघात स्थान मिळालेला स्कोट कुग्लेन आंतरराष्ट्रीय सामन्यामुळे बंगळुरू संघात खेळणार नाही. याशिवाय केन रिचर्डसन देखील सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. अशात बंगळुरू संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यांच्या जागेवर माईक हेसन यांच्याकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या सर्व बदलाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. यात त्यांनी सांगितलं की, आयपीएल 2021 च्या दुसऱ्या हाफमध्ये हसरंगाला झम्पाच्या जागेवर स्थान देण्यात आलं आहे. ज्याने भारतीय संघाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती.
दरम्यान, भारतात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आयपीएल 2021चा हंगाम अचानक मध्यातून स्थगित करण्यात आला होता. आता हा उर्वरित हंगाम युएईमध्ये पुन्हा खेळवला जाणार आहे. यात राहिलेले सर्व सामने खेळवले जाणार असून या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - महिला वेगवान गोलंदाज मेगन शटच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म
हेही वाचा - पी. व्ही. सिंधूने सपना चौधरीच्या गाण्यासह बॉलीवूड साँगवर धरला ठेका, पाहा व्हिडिओ