दुबई : आयसीसीने एकदिवसीय फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर (ICC ODI batsmen rankings) केली आहे. या ताज्या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Pakistan captain Babar Azam) (873 गुण) अव्वलस्थनी कायम आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचे दोन फलंदाज टॉप पाचमध्ये आहेत. ज्यामध्ये विराट कोहली हा 828 गुणांनी दुसऱया स्थानी कायम आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Indian captain Rohit Sharma) 807 गुणांनी तिसऱ्या स्थानी कायम आहे.
-
🔹 Babar Azam still at the top
— ICC (@ICC) February 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🔹 Rohit Sharma closes in on Virat Kohli
🔹 Fakhar Zaman and Joe Root sneak into the top 10
Here’s how things stand after the latest update to the @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings for batters 📈
More details 👉 https://t.co/gkPWgLbUCq pic.twitter.com/JOgc1SpQKm
">🔹 Babar Azam still at the top
— ICC (@ICC) February 9, 2022
🔹 Rohit Sharma closes in on Virat Kohli
🔹 Fakhar Zaman and Joe Root sneak into the top 10
Here’s how things stand after the latest update to the @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings for batters 📈
More details 👉 https://t.co/gkPWgLbUCq pic.twitter.com/JOgc1SpQKm🔹 Babar Azam still at the top
— ICC (@ICC) February 9, 2022
🔹 Rohit Sharma closes in on Virat Kohli
🔹 Fakhar Zaman and Joe Root sneak into the top 10
Here’s how things stand after the latest update to the @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings for batters 📈
More details 👉 https://t.co/gkPWgLbUCq pic.twitter.com/JOgc1SpQKm
दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा फलंदाज शाई होपने (West Indies batsman Shy Hope) आपल्या क्रमवारीत घसरण नोंदवली आहे. तो भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आसीसी पुरुषांच्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीतील पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे. तसेच ताज्या क्रमवारीत पाकिस्तानचा फखर जमान आणि इंग्लंडचा जो रूट फलंदाजी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये पोहोचले आहेत.
दरम्यान, एक मोठी झेप घेत, आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग 2 चा (ICC Cricket World Cup League 2) भाग असलेल्या ओमानच्या जतिंदर सिंगने (Jatinder Singh of Oman) यूएई मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावून फलंदाजी क्रमवारीत अव्वल 100 मध्ये प्रवेश केला आहे. लीग 2 स्पर्धेच्या 23 सामन्यांत 594 धावांसह सर्वाधिक धावा करणारा जतिंदर सिंग दुसरा खेळाडू ठरला आहे.
तसेच गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये कोणते ही बदल झाले नाहीत. परंतु वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने भारता विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात, अर्धशतक झळकावल्यामुळे त्याला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत फायदा झाला आहे. तो चार स्थानांनी मोठी उडी घेत पहिल्या 20 जणांमध्ये दाखल झाला आहे.