पुणे: अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानने (Legspinner Rashid Khan ) टी-20 क्रिकेटमध्ये आपली चमकदार कामगिरी सातत्याने सुरू ठेवली आहे. राशिदच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम असून आता आणखी एक विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. T20 क्रिकेटमध्ये 450 बळी घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो आणि दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहिर यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज आहे.
-
Magician OP 💙🤩🔥#SeasonOfFirsts #AavaDe #LSGvGT pic.twitter.com/3W0faSBKo0
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Magician OP 💙🤩🔥#SeasonOfFirsts #AavaDe #LSGvGT pic.twitter.com/3W0faSBKo0
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 10, 2022Magician OP 💙🤩🔥#SeasonOfFirsts #AavaDe #LSGvGT pic.twitter.com/3W0faSBKo0
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 10, 2022
काल रात्री लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध ( Lucknow Super Giants ) खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 57 व्या सामन्यात राशिदने हा कारनामा केला आहे. या सामन्यात त्याने चार विकेट घेत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. राशिद या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने आपल्या नवीन फ्रँचायझीसाठी सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. या मोसमात खेळल्या गेलेल्या 12 सामन्यांमध्ये राशिदने 21.66 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने सातपेक्षा कमी इकॉनॉमीने धावा केल्या आहेत.
काल रात्री लखनौविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरातच्या ( Gujarat Titans Batting ) फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना निराशा केली. ज्यामुळे संपूर्ण संघ केवळ 144 धावाच करू शकला. शुबमन गिलने नाबाद अर्धशतक ( Shubman Gill Unbeaten Half Century ) झळकावून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्याला मजबूत धावसंख्या उभारता आली नाही.
-
Rashid Khan is our Top Performer from the second innings for his excellent bowling figures of 4/24.
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #LSGvGT pic.twitter.com/2kIQWyQmFY
">Rashid Khan is our Top Performer from the second innings for his excellent bowling figures of 4/24.
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2022
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #LSGvGT pic.twitter.com/2kIQWyQmFYRashid Khan is our Top Performer from the second innings for his excellent bowling figures of 4/24.
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2022
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #LSGvGT pic.twitter.com/2kIQWyQmFY
145 धावांचे लक्ष्य पाहता लखनौ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत सामना जिंकला. 19 धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट गमावणाऱ्या लखनौसाठी गुजरातची गोलंदाजी खूपच धारदार ठरली आणि संपूर्ण संघ 82 धावांवर बाद झाला. राशीदशिवाय यश दयाल आणि आर साई किशोर यांनीही गुजरातकडून प्रत्येकी दोन बळी घेतले.
हेही वाचा - Mark Boucher Allegation : क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मार्क बाउचरवरील आरोप मागे घेतले