ETV Bharat / sports

Shaheen Shah Afridi Nikah : शाहीन शाह आफ्रिदी अडकला विवाहबंधनात! 'या' दिग्गज खेळाडूच्या मुलीशी केला निकाह - अंशा आफ्रिदी

पाकिस्तानी क्रिकेटर शाहीन आफ्रिदीने माजी दिग्गज क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदीशी निकाह केला आहे. शाहीनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहीनचे चाहते त्याला कमेंट करून शुभेच्छा देत आहेत.

Shaheen Shah Afridi Nikah
शाहीन शाह आफ्रिदी निकाह
author img

By

Published : Feb 4, 2023, 9:56 AM IST

कराची (पाकिस्तान) : पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी विवाहबंधनात अडकला आहे. शाहीन आणि अंशा आफ्रिदीचे शुक्रवारी कराचीमध्ये लग्न झाले. अंशा आफ्रिदी ही पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे. शाहीनच्या लग्नात पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंसह त्याचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. शाहीन आणि अंशाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहेत. त्याच्या चाहत्यांसह अनेक दिग्गज त्याच्या फोटोवर कमेंट करून त्याला अभिनंदनाचे संदेश देत आहेत.

Shaheen Shah Afridi Nikah
निकाहाला क्रिकेटपटूंची हजेरी

मुस्लिम धर्मानुसार निकाह : शाहीन शाह आणि अंशा आफ्रिदीच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. या दोघांचा सुमारे 2 वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता. आता दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. 3 फेब्रुवारीला कराचीत त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत शाहीन-अंशा यांनी लग्न करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मुस्लिम धर्मानुसार विधी पार पाडत दोघांनीही एकमेकांचा स्वीकार केला. शाहीन आणि अंशाचा मेहंदी सेरेमनी 2 फेब्रुवारीला पार पडला होता.

Shaheen Shah Afridi Nikah
निकाहाला क्रिकेटपटूंची हजेरी

बाबर आझमने मिठी मारून दिल्या शुभेच्छा : पाकिस्तानचा क्रिकेटर शाहीन आफ्रिदी आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. शाहीनने पाकिस्तान संघासाठी अनेक मोठ्या प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. शाहीन-अंशाच्या निकाहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम शाहीनला मिठी मारून लग्नासाठी शुभेच्छा देत असल्याचे दिसत आहे.

शाहीनवर अभिनंदनाचा वर्षाव : निकाहनंतर शाहीनवर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. पाकिस्तान सुपर लीग टीम लाहोर कलंदर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलने शाहीन आणि अंशा आफ्रिदीला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लाहोर कलंदरच्या इतर खेळाडूंनी शाहीन आफ्रिदीच्या लग्नाबद्दल अभिनंदन केले. शाहीन आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर संघाकडून खेळतो. शाहीनच्या लग्नानंतर पाकिस्तानचे सोशल मीडिया यूजर्स शाहीनच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर करत त्याला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

Shaheen Shah Afridi Nikah
शाहीन आणि अंशा

बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी जडेजाचे पुनरागमन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारताचा सुपरस्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा तंदुरुस्त झाला आहे. तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचे पुनरागमन संघाला बळ देईल. कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारताचे कर्णधारपद सांभाळेल तर केएल राहुल उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा : Ravikant Shukla Fraud : बिल्डरची क्रिकेटरला जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.