हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) च्या म्हणजेच आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला ( Fifteenth season of IPL ) लवकरच सुरुवात होणार आहे. या पर्वासाठी स्पर्धेतील 10 ही संघ पूर्ण तयारीने सज्ज झाले आहेत. या 15 व्या हंगामाचा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रवारीला पार पडला. लखनऊ सुपरजायंट्सने ( Lucknow Super Giants ) प्रथमच या स्पर्धेत सहभागी होताना मेगा लिलावात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे.
मेगा लिलावात आयपीएलच्या नवी टीम लखनऊ सुपर जॉइंट्सने ( Lucknow Super Giants ) भरपूर पैसा उडवला आहे. चालू हंगामात, लखनऊ ही एकमेव फ्रँचायझी आहे, ज्याने तिजोरी पूर्णपणे रिकामी केली आहे. मेगा लिलावानंतर लखनऊ फ्रेंचायझीच्या पर्समध्ये एक रुपयाही शिल्लक राहिलेला नाही.
लखनऊ सुपरजायंट्सने पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होताना, मोठ्या प्रमाणात मेगा लिलावात बोली लावत खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट केले. ज्यामध्ये लिलावात 10 कोटींची बोली लावून त्यांनी वेगवान गोलंदाज आवेश खानला ( 10 crore Bid bowler Awesh Khan ) त्याच्यासोबत जोडले. या लिलावात संघाने विकत घेतलेला तो सर्वात महागडा खेळाडू आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा ( Former Indian cricketer Akash Chopra ) याने स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू च्या त्याच्या खात्याद्वारे ही माहिती दिली आहे. तो म्हणाला, आजपर्यंतचा हा त्याचा पहिला लिलाव आहे, पण लखनऊ सुपरजायंट्सला माझ्या मते मिळाला आहे. या क्लिपमध्ये त्यांच्या खरेदीबद्दल मला काय म्हणायचे आहे ते बघा.
या स्पर्धेत पहिल्यांदाच दाखल झालेला लखनऊचा संघ खूपच मजबूत दिसत आहे. या संघात दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू क्विंटन डी कॉक ( South African player Quinton de Kock ) हा सलामीला केएल राहुलसोबत येऊ शकतो. तसेच जेसन होल्डर, कृणाल पंड्या यांसारखे अष्टपैलू खेळाडूही संघात सामील झाले आहेत. आवेश खान आणि अंकित राजपूत या युवा वेगवान गोलंदाजांचा देखील समावेश आहे.
लखनऊ सुपरजायंट्सचे खेळाडू ( Players of Lucknow Super Giants ) -
क्विंटन डी कॉक 6.75 कोटी, मनीष पांडे 4.6 कोटी, जेसन होल्डर 8.75 कोटी, दीपक हुडा 5.74 कोटी, क्रुणाल पांड्या 8.25 कोटी, मार्क वुड 7.5 कोटी, आवेश खान 10 कोटी, अंकित राजपूत 50 लाख रुपये, के गौतम 90 लाख रुपये, दुष्मंता चमिरा 2कोटी रुपये, शाहबाज नदीम 50 लाख रुपये, मनन वोहरा 20 लाख रुपये, मोहसीन खान 20 लाख रुपये, आयुष बडोनी 20 लाख रुपये, करण शर्मा 20 लाख रुपये, काईल मायर्स 20 लाख रुपये, एविन लुईस 2 कोटी रुपये आणि मयंक यादव 20 लाख रुपये.