हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये गुजरात टायटन्सने चालू हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सने आपला पदार्पण हंगाम खेळत आयपीएल ( IPL 2022 ) च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने क्वालिफायर-1 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केला.
गुजरात टायटन्सचा सामना रविवार, 29 मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत त्यांच्या घरच्या मैदानावर अहमदाबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील विजेत्याशी होईल. दुसरा क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( RCB ) आणि राजस्थान रॉयल्स ( RR ) यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकल्यास अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचेच पारडे विरोधी संघावर भारी पडू शकते.
आता जाणून घ्या महत्वाची गोष्ट -
वास्तविक, आयपीएलच्या इतिहासात असे तीनदाच झाले आहे, जेव्हा क्वालिफायर-1चा विजेता संघ चॅम्पियन बनला नाही. 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि 2017 च्या मोसमातील रायझिंग पुणे सुपर जायंट्सचा संघ क्वालिफायर-1 जिंकूनही अंतिम सामन्यात पराभूत झाले आहेत. उर्वरित आठ वेळा क्वालिफायर-1 मधील केवळ विजेता संघच चॅम्पियन बनू शकला आहे. चला बघूया...
- 2011 क्वालिफायर-1: चेन्नई सुपर किंग्ज सहा गडी राखून विजयी. चेन्नईने फायनलमध्ये 58 धावांनी विजय मिळवला
- 2012 क्वालिफायर-1: कोलकाता नाइट रायडर्स 18 धावांनी विजयी. कोलकाताने अंतिम फेरीत पाच विकेट्स राखून विजय मिळवला
- 2013 क्वालिफायर-1: चेन्नई सुपर किंग्जने 48 धावांनी सामना जिंकला. फायनलमध्ये मुंबईने 23 धावांनी विजय मिळवला
- 2014 क्वालिफायर-1: कोलकाता नाइट रायडर्स 28 धावांनी विजयी. कोलकाताने अंतिम फेरीत तीन विकेट्स राखून विजय मिळवला
- 2015 क्वालिफायर-1: मुंबई इंडियन्स 25 धावांनी विजयी. अंतिम फेरीतही मुंबईने 41धावांनी विजय मिळवला.
- 2016 क्वालिफायर-1: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चार गडी राखून विजयी. अंतिम फेरीत सनरायझर्सने आठ धावांनी सामना जिंकला
- 2017 क्वालिफायर-1: रायझिंग पुणे सुपरजायंट्स 20 धावांनी विजयी. अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने एका धावेने विजय मिळवला
- 2018 क्वालिफायर-1: चेन्नई सुपर किंग्ज दोन गडी राखून विजयी. चेन्नईने अंतिम फेरीत आठ विकेट्स राखून विजय मिळवला
- 2019 क्वालिफायर-1: मुंबई इंडियन्स सहा गडी राखून विजयी. अंतिम फेरीत मुंबईचा एक धावेने विजय
- 2020 क्वालिफायर-1: मुंबई इंडियन्स 57 धावांनी विजयी. अंतिम फेरीतही मुंबई पाच गडी राखून विजयी ठरली.
- 2021 क्वालिफायर-1: चेन्नई सुपर किंग्ज चार गडी राखून विजयी. अंतिम फेरीतही चेन्नईने 27 धावांनी विजय मिळवला.
प्लेऑफ फॉरमॅटबद्दल जाणून घेऊ -
आयपीएलमधील प्लेऑफ फॉर्मेटला 2011 पासून सुरूवात झाली आहे. ज्यामध्ये एकूण चार सामने आयोजित केले जाऊ लागले. यापूर्वी, 2008, 2009 आणि 2010 च्या आयपीएल हंगामात प्रत्येकी दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम सामना खेळण्याची तरतूद होती. परंतु 2011 पासून त्यामध्ये बदल केला. ज्यामुळे आता क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना, असे चार सामने प्लेऑफमध्ये आयोजित केले जातात. पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघ क्वालिफायर-1 खेळतात, ज्याचा विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करतो. त्याच वेळी, पराभूत संघाला क्वालिफायर 2 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. ज्याचा सामना एलिमिनेटर मधील विजेत्याशी होतो.
हेही वाचा - Ipl 2022 Updates : स्मिथ आणि शास्त्रीच्या मते 'असा' होणार राजस्थान बंगळुरुचा क्वालिफायर सामना