नवी दिल्ली: आगामी आयपीएलच्या (Indian Premier League) पंधराव्या हंगामामध्ये केएल राहुल लखनऊ फ्रँचायझीचे नेतृत्व करताना (KL Rahul will lead Lucknow franchise) दिसून येणार आहे. कारण याबाबत लीगच्या सूत्राने मंगळवारी पीटीआयला सांगितले आहे. लीगच्या सूत्राने सांगितले, की बंगळुरूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी ड्राफ्टमध्ये (Selected from draft before mega auction) लखनऊने निवडलेल्या खेळाडूंपैकी राहुल एक असल्याचे सांगितले आहे.
इतर दोन खेळाडू ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस (All-rounder Marcus Stoinis) आणि अनकॅप्ड लेग-स्पिनर रवी बिश्नोई (Leg-spinner Ravi Bishnoi) असण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, राहुल लखनऊचे कर्णधारपद भूषवणार (KL Rahul to captain Lucknow franchise)आहे. संघ इतर दोन ड्राफ्टवर निर्णय घेत आहे. राहुलने गेल्या दोन हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. परंतु फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही. कारण त्याला आयपीएल लिलावात उतरायचे होते.
तसेच बिश्नोई या अगोदर पंजाब संघाकडून खेळत होता. तर स्टॉइनिसने दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले होते. RPSG ग्रुपने लखनौ फ्रँचायझी (RPSG Group buys Lucknow franchise) विकत घेण्यासाठी 7090 कोटी रुपये खर्च केले होते. तसेच जखमी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुल सध्या दक्षिण आफ्रिकेत भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार (KL Rahul will lead Indian ODI team) आहे.
हेही वाचा : Badminton Competition: श्रीकांत, लक्ष्य यांनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीयमधून घेतली माघार