मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा फलंदाज विराट कोहलीने गुरुवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक झळकावले. धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हैदराबाद संघाविरुद्धचा सामना जिंकला आहे. मात्र हा सामना जिंकल्यानंतर विराटने त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला व्हिडिओ कॉल केला. विराट आणि अनुष्काचे व्हिडिओ कॉलवर बोलतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत.
-
Virat Kohli on a video call with Anushka Sharma after the match
— AFTAB (@aftab169) May 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
one of the best moments in the IPL#RCBvSRH #ViratKohli pic.twitter.com/kfUQdYn1gQ
">Virat Kohli on a video call with Anushka Sharma after the match
— AFTAB (@aftab169) May 18, 2023
one of the best moments in the IPL#RCBvSRH #ViratKohli pic.twitter.com/kfUQdYn1gQVirat Kohli on a video call with Anushka Sharma after the match
— AFTAB (@aftab169) May 18, 2023
one of the best moments in the IPL#RCBvSRH #ViratKohli pic.twitter.com/kfUQdYn1gQ
-
Virat Kohli on a video call with Anushka Sharma after the match
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The most beautiful moment! pic.twitter.com/3xoQILaMFF
">Virat Kohli on a video call with Anushka Sharma after the match
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 18, 2023
The most beautiful moment! pic.twitter.com/3xoQILaMFFVirat Kohli on a video call with Anushka Sharma after the match
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 18, 2023
The most beautiful moment! pic.twitter.com/3xoQILaMFF
अनुष्काने केले पतीच्या या शानदार खेळीचे कौतुक : विराट कोहलीने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शतक झळकावल्यानंतर त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. दुसरीकडे त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही पती विराटचे चांगलेच कौतुक केले आहे. अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीत एक कोलाज चित्र शेअर केले आहे. त्याला बॉम्ब इमोटिकॉनसह कॅप्शन दिले, 'ती एक स्फोटक खेळी असल्याचे या स्टोरीत नमूद करण्यात आले आहे.
-
Virat on a Video call with Anushka ❤❤❤ pic.twitter.com/gLUIp7UEUT
— Shreya ❤ (@Shreyaztweets) May 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Virat on a Video call with Anushka ❤❤❤ pic.twitter.com/gLUIp7UEUT
— Shreya ❤ (@Shreyaztweets) May 18, 2023Virat on a Video call with Anushka ❤❤❤ pic.twitter.com/gLUIp7UEUT
— Shreya ❤ (@Shreyaztweets) May 18, 2023
एका ट्विटर यूजरने केला फोटो शेअर : विराट कोहलीने शतकीय पारी खेळल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माला व्हिडिओ कॉल केला. यावेळी विराट आणि अनुष्का शर्मा व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाचा फोटो एक यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा व्हिडिओ कॉलवर बोलतानाचा हा फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोवर त्या यूजरने सुंदर क्षण असे कॅप्शन दिले आहे.
बंगळुरूचा हैदराबादवर विजय : गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हैदराबादच्या संघावर दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसच्या 172 धावांच्या चित्तथरारक भागीदारीने सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शानदार खेळी खेळली. विराट कोहली आणि फाप डू प्लेसिस या दोघांनीही जोरदार खेळाचे प्रदर्शन करत त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला. तसेच विराट कोहलीने शतक झळकावल्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये शतकासाठी चार वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. आयपीएल 2023 मधील कोहलीचे हे पहिले शतक आहे. विराटने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या ख्रिस गेलची बरोबरी केली. विराट कोहलीने एप्रिल 2019 नंतर पहिले आयपीएल शतक झळकावले आहे.
अनुष्का दिसणार झुलन गोस्वामीच्या भूमिकेत : विराट कोहली क्रिकेटमध्ये विविध विक्रम रचत असताना त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहे. अनुष्का शर्मा आगामी चित्रपटात तिचा भाऊ करनेश शर्माने दिग्दर्शीत केलेल्या चकदा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे. त्यासह अनुष्का शर्मा भारतीय महिला संघाची धडाकेबाज गोलंदाज झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. आपल्या मुलीच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
हेही वाचा -