ETV Bharat / sports

IPL 2023 : रोमांचक मॅच नंतर पंजाब किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ५ धावांनी विजय - राजस्थान रॉयल्स

आयपीएल 2023 चा 8 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात गुवाहाटी येथे झाला यात. पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सवर ५ धावांनी विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनेम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 197 धावा केल्या.रोमांचक मॅच नंतर पंजाब ने राजस्थान ला नमवत ५ धावांनी विजय नोंदवला

IPL 2023
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
author img

By

Published : Apr 5, 2023, 1:26 PM IST

Updated : Apr 6, 2023, 12:15 AM IST

गुवाहाटी : आयपीएल 2023 चा 8 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात गुवाहाटी येथे खेळला गेला. पंजाबने 20 षटकांत 4 गडी गमावून 197 धावा केल्या. तर राजस्थानने 20 षटकांत 7 गडी गमावून 192 धावा केल्या. आणि राजस्थानचा 5 धावांनी पराभव झाला.

पंजाबचा सलग दुसरा विजय : आजच्या मॅच नंतर पंजाब किंग्जने या मोसमातला सलग दुसरा विजय नोदवला आहे. IPL 2023 चा 8 वा सामना गुवाहाटी येथील बार्सपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने 5 धावांनी विजय मिळवला. हे मैदान राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राउंड आहे. या सामन्यात कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 4 गडी गमावून 197 धावा केल्या.

शिखरची झंझावती खेळी : 198 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 192 धावा केल्या. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने झंझावाती खेळी करताना 56 चेंडूत 86 धावा केल्या. या डावात 153.57 च्या स्ट्राईक रेटने खेळताना धवनने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच वेळी, 22 वर्षीय युवा फलंदाज प्रभसिमरन सिंगनेही शानदार फलंदाजी करत 34 चेंडूत 176.47 च्या सरासरीने 60 चेंडू जोडले. या खेळीत त्याने 7 आणि 3 षटकारही मारले. याशिवाय जितेश शर्माने 16 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या.

संजू सॅमसनने साभाळला डाव : 198 धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल 8 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला. त्याला अर्शदीप सिंहने आउट केले. त्यानंतर आलेला अश्विनही काही कमाल दाखवू शकला नाही. तो भोपळा न फोडताच बाद झाला. त्यालाही अर्शदीपने धवनच्या हातून झेलबाद केले. भरवश्याचा फलंदाज जोस बटलरला इलिसने 19 धावांवर बाद केले. कर्णधार संजू सॅमसनने एका टोकाने फलंदाजी करत राजस्थानचा डाव सांभाळला. मात्र त्याला 42 च्या स्कोरवर इलिसनेच बाद केले.

शिखर धवनचे धडाकेबाज अर्धशतक : गुवाहाटीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना पंजाबने धडाकेबाज सुरुवात केली. शिखर धवनने कर्णधाराच्या रुपात आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक ठोकले. पंजाब किंग्सने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा केल्या आहेत. शिखर धवन 56 चेंडूत शानदार 86 धावा काढून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. राजस्थानकडून जेसन होल्डरने 29 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट घेतल्या.

प्रभसिमरनची शानदार फलंदाजी : पंजाबकडून कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग सलामीला उतरले. क्रिजवर येताच दोघांनी चौकार षटकारांची आतषबाजी लावली. प्रभसिमरन 34 चेंडूत 60 धावा करून बाद झाला. त्याला जेसन होल्डरने जोस बटलरच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर आलेला राजपक्षे अवघ्या 1 धावेवर रिटायर्ड हर्ट आउट झाला. विकेटकीपर जितेश शर्माने शानदार फलंदाजी करत 16 चेंडूत 27 धावा ठोकल्या. त्याला चहलने रियान परागच्या हातून झेलबाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 : राजस्थान रॉयल्स - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम असिफ, युझवेंद्र चहल ; पंजाब किंग्ज : प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.

शिखर धवनच्या हाती कमान : दोन्ही संघांमध्ये धडाकेबाज खेळाडू आहेत जे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकतात. रॉयल्सकडे जोस बटलर, यशस्वी जयस्वालसारखे चांगले फलंदाज आहेत, तर युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्टसारखे विकेट घेणारे गोलंदाजही आहेत. पंजाब किंग्सही रॉयल्ससारखेच स्ट्रॉंग आहेत. यावेळी संघाची कमान शिखर धवनच्या हाती आहे. अर्शदीप सिंग आणि कागिसो रबाडासारखे खतरनाक गोलंदाज किंग्जच्या संघात आहेत. शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जने डकवर्थ लुईस पद्धतीने कोलकाता नाईट रायडर्सचा सात धावांनी पराभव केला. भानू राजपक्षेने रायडर्सविरुद्ध 32 चेंडूत 50 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. शिखरने 29 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. केकेआरकडून अर्शदीप सिंगने तीन बळी घेतले. सॅम कुरन, नॅथम एलिस, राहुल चहर आणि सिकंदर रझा यांनी 1-1 विकेट घेतली.

दोघांत पहिलाच सामना : आयपीएल 2023 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबचा पहिला सामना होणार आहे. या दोघांमधील गेल्या पाच सामन्यांमध्ये रॉयल्सचा वरचष्मा राहिला आहे. रॉयल्सने पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. पंजाबला फक्त एकच सामना जिंकता आला. मयंक अग्रवाल आयपीएल 2022 मध्ये पंजाबचा कर्णधार होता पण यावेळी शिखर धवन किंग्जची कमान सांभाळत आहे.

हे ही वाचा : Fastest 5000 Runs in IPL by Indians : माहीने आयपीएलमध्ये पूर्ण केल्या 5 हजार धावा, जाणून घ्या सर्वात कमी बॉलमध्ये पराक्रम करणारा खेळाडू कोण...

Last Updated : Apr 6, 2023, 12:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.