ETV Bharat / sports

IPL 2023 : सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सला चारली पराभवाची धूळ

author img

By

Published : Apr 14, 2023, 1:40 PM IST

Updated : Apr 15, 2023, 6:19 AM IST

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 229 धावांचे लक्ष्य पूर्ण करताना कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 205 धावा करता आल्या आहे.

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

कोलकाता : हातातोंडाशी आलेला सामना कोलकाता नाईट रायडर्सला केवळ 23 धावांच्या फरकाने गमवावा लागला. खेळाच्या सुरुवातीलाच कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजी ढेपाळत गेले. सुरुवातीला २० धावांच्या स्कोअरवर कोलकाता नाईट रायडर्सने ३ गडी गमावले होते. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार नितीश राणाने कर्णधाराला साजेशा पद्धतीने वेगवान धावा केल्या. नितीश राणाने 41 चेंडूत 75 धावांची खेळी करत सामाना जिंकण्याच्या टप्प्यात आणला. शेवटच्या षटकात केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने संघाला विजय मिळवून देण्यासाठी चांगलीच खिंड लढविली. पण तरीही केकेआरने सामना 23 धावांनी गमावला. रिंकू सिंगने 31 चेंडूत 58 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. सनरायझर्स हैदराबादचा हंगामातील हा सलग दुसरा विजय असल्याने सनरायझर्स हैदराबादचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज ईडन गार्डन्सवर सामना झाला आहे. केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 228-4 धावा केल्या आहेत. आता कोलकाताला विजयासाठी 229 धावांची आवश्यकता आहे. हैदराबादकडून हॅरी ब्रूकने शानदार शतक झळकावले. त्याने 55 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसलने 3 गडी बाद केले

  • 💜 THE STAGE IS SET 🧡

    "𝙎𝙍𝙃... 𝙎𝙍𝙃..." Let the cheer echo in Kolkata tonight! 🔥 pic.twitter.com/CO3gVt45q2

    — SunRisers Hyderabad (@SunRisers) April 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एडन मार्करमचे अर्धशतक : हैदराबादचा सलामीवीर मयंक अग्रवाल 13 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. त्याला आंद्रे रसेलने वरुण चक्रवर्तीच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर आलेला त्रिपाठीही लवकरच तंबूत परतला. त्याला 9 रन्सवर रसलनेच बाद केले. कर्णधार एडन मार्करमने हॅरी ब्रूक सोबत मिळून डावाला आकार दिला. तो 26 चेंडूत 50 धावा काढून बाद झाला. त्याला चक्रवर्तीने रसलच्या हाती झेलबाद केले. युवा अभिषेक शर्माने 32 धावांचे योगदान दिले. त्याला रसलने शार्दुल ठाकूरच्या हाती झेलबाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 - कोलकाता नाइट रायडर्स - रहमनुल्हाह गुरुबाज (विकेटकीपर), एन. जगदीशन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लोकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती ; सनरायझर्स हैदराबाद - हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरीच क्लासेन (विकेटकीपर), मार्को यानसन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय, उमरान मलिक, टी. नटराजन.

आयपीएल 2023 मध्ये, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी हंगामातील त्यांचे पहिले सामने गमावले, परंतु हळूहळू त्यांच्या संघाचे विजयी वाहन पुन्हा ट्रॅकवर आणण्यात यशस्वी झाले. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत खेळलेल्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादने तीन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. आज दोन्ही संघ एकमेकांचा विजयी रथ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.

केकेआर संघ फाॅर्ममध्ये : कोलकाता नाईट रायडर्सला सामन्यानुसार चांगला फॉर्म असलेले खेळाडू मिळत आहेत. आधी शार्दुल ठाकूर आणि नंतर रिंकू सिंगने विजय मिळवून संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध रिंकूने शेवटच्या षटकात मारलेले पाच षटकार इतक्या सहजासहजी क्रिकेटविश्व विसरणार नाही. कोलकाता नाईट रायडर्सचे तारे अजूनही उंचावत आहेत. मागील दोन सामन्यात 200 हून अधिक धावा करणाऱ्या या संघाने पहिल्या सामन्यात आपल्या धावसंख्येचा बचाव केला आणि दुसऱ्या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करत आपल्या फलंदाजीचे पराक्रम दाखवले. आजच्या सामन्यातही संघाकडून अशीच अपेक्षा आहे.

कोलकाता नाइट रायडर्सने 15 सामने जिंकले : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये कोलकाता नाइट रायडर्सने 15 आणि सनरायझर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत. पहिल्या दोन सामन्यात संघर्ष केल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा संघही दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या विजयात मार्को जॉन्सनने शानदार गोलंदाजी केली, तर कर्णधार एडन मार्करामने 21 चेंडूत 37 धावा करत राहुल त्रिपाठीला साथ दिली.

रॉय आणि लिटन कोलकाता येथे पोहोचले : कोलकाता नाईट रायडर्सला सध्या सुरुवातीच्या संयोजनात फेरबदल करावे लागतील. रहमानउल्ला गुरबाजला आतापर्यंत तीन सामन्यांत तीन वेगवेगळे भागीदार मिळाले आहेत. जेसन रॉय आणि लिटन दास या खेळाडूंचा संघात समावेश झाल्याने सलामीच्या जोडीत बदल होऊ शकतो.

सनरायझर्स हैदराबादवरही नजर : शेवटच्या सामन्यात हॅरी ब्रूकने अनमोलप्रीत सिंगच्या जागी टॉप ऑर्डरला स्थान दिले आणि सनरायझर्सने हेनरिक क्लासेनचाही प्रयत्न केला. हे दोघेही या सामन्यात खेळणार आहेत. गोलंदाजीमध्ये कोणतेही बदल करून हैदराबाद गोलंदाजी सुधारण्यासाठी पुढाकार घेऊ शकते. कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलमध्ये सनरायझर्सविरुद्ध त्यांच्या फिरकीपटूंच्या रणनीतीवर काम करू शकतात, कारण सनरायझर्स हैदराबाद फिरकीविरुद्ध कमकुवत दिसत आहे. हैदराबाद संघाने आतापर्यंत फिरकीपटूंविरुद्ध 12 विकेट गमावल्या आहेत. या मोसमात फिरकीपटूंविरुद्ध त्याचा सर्वात कमी स्ट्राइक रेट (101) आणि सरासरी (13.7) आहे. सुनील नरेन यात विशेष भूमिका साकारू शकतात.

वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन म्हणाला : कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन म्हणतो की T20 हा एक उत्तम खेळ आहे. शेवटच्या चेंडूवर खेळ जिंकला किंवा हरला जाऊ शकतो. गेल्या काही सामन्यांपासूनही हेच घडत आहे. प्रत्येक आयपीएल मोसमात, जेव्हा मी संघाचा भाग होतो, तेव्हा असे दिसते की प्रत्येक सामना शेवटच्या षटकापर्यंत जातो. यामुळेच आयपीएलचा थरार चांगलाच रंगला आहे.

हेही वाचा : IPL 2023 : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अश्विनला 25 टक्के मॅच फीचा दंड

Last Updated : Apr 15, 2023, 6:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.