नवी दिल्ली : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील दुसऱ्या दिवशी पंजाब किंग्जची लढत केकेआरशी थोड्याच वेळात लढत सुरू होणार आहे. केकेआरची कमान नितीश राणा सांभाळणार आहेत. पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) दुपारी ठिक 3.30 वाजता एकमेकांसमोर असणार आहेत. तर दुसरा सामना ठिक संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात ही लढत होणार आहे. पंजाब आणि केकेआर गेल्या मोसमात सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर होते. पंजाबची कमान शिखर धवनच्या हाती आहे. त्याचबरोबर ट्रेव्हर बेलिस हे संघाचे नवे प्रशिक्षक आहेत.
192 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेली केकेआर : केकेआर 192 धावांचे मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतरले. एवढे मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेली केकेआरची सलामी जोडी मनदीप सिंह आणि रशमनुल्ला गुरबाज यांची सुरुवात डळमळीतच झाली. मनदीप सिंह अवघ्या 2 धावांवर अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवर सॅम कुरणद्वारे झेलबाद झाला. त्यानंतर गुरबाजने संघाची कमान चांगली सांभाळत 16 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या अनुकूल राॅय अर्शदीपच्या बाॅलवर झेलबाद झाला. व्यंकटेश अय्यरने 28 चेंडूत 34 धावांची तडाखेबाज फलंदाजी करीत संघांची धावसंख्या हलती ठेवली.
-
Sam Curran joins the wicket party 🥳 and Arshdeep Singh takes another 🙌@PunjabKingsIPL celebrate departures of Andre Russell and Venkatesh Iyer#KKR need 46 runs in 24 balls#TATAIPL | #PBKSvKKR pic.twitter.com/wQxzdhLZcX
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sam Curran joins the wicket party 🥳 and Arshdeep Singh takes another 🙌@PunjabKingsIPL celebrate departures of Andre Russell and Venkatesh Iyer#KKR need 46 runs in 24 balls#TATAIPL | #PBKSvKKR pic.twitter.com/wQxzdhLZcX
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2023Sam Curran joins the wicket party 🥳 and Arshdeep Singh takes another 🙌@PunjabKingsIPL celebrate departures of Andre Russell and Venkatesh Iyer#KKR need 46 runs in 24 balls#TATAIPL | #PBKSvKKR pic.twitter.com/wQxzdhLZcX
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2023
पंजाब किंग्ज प्रथम फलंदाजी करताना : प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचे सलामीवीर प्रभसिमरन सिंह आणि शिखर धवन याने डावाची सुरुवात केली. पंजाब किंग्जने डावाची दमदार सुरुवात केली. प्रभसिमरन सिंह याने धडाकेबाज फलंदाजी करीत 12 चेंडूत 23 धावा करीत चांगली सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षे याने जोरदार फटकेबाजी करीत 32 चेंडूत 50 धावा केल्या. कर्णधार शिखर धवन याने संयमी खेळी करीत 29 चेंडूत 40 धावा करून संघाच्या धावसंख्येला आकार दिला. तो वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर जितेश शर्माने 11 चेंडूत 21 धावा केल्या. त्याला साऊथीने उमेश यादवद्वारे झेलबाद केले. सिकंदर राझा यावेळी विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने 13 चेंडूत 16 धावा केल्या. सॅम कुरन आणि शाहरुख खान ही जोडी शेवटपर्यंत नाबाद राहिली. सॅ कुरनने 17 चेंडूत 26 धावा केल्या, तर शाहरुख खानने 7 चेंडूत 11 धावा करून धावसंख्या संघाची धावसंख्या 191 पर्यंत पोहचवली.
पंजाब किंग्जची कामगिरी : कोलकत्ता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेली पंजाब किंग्जकडून सलामीला शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग ही जोडी उतरली. नवीनच आयपीएलमध्ये उतरलेला प्रभसिमरन सिंग हा स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो. त्याने पंजबा किंग्जची जोरदार सुरुवात केली. परंतु, साऊथीच्या एका चेंडूवर तो गुरबाजकडून यष्टीच्या मागे झेलबाद झाला.
शिखर धवनच्या संघात सर्वाधिक परदेशी खेळाडू : आयपीएलच्या आज दुसरा दिवशी पंजाब किंग्जची कोलकाता नाईट रायडर्सशी लढत चालू आहे. शिखर धवनच्या संघात सर्वाधिक परदेशी खेळाडू आहेत. तर केकेआर संघात निम्मे भारतीय खेळाडू आहेत. काही परदेशी खेळाडू असल्याचेही दिसते. पंजाब किंग्जच्या घरच्या मैदानावर सामना होणार असला तरी बाजी कोण मारते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
केकेआरच्या कर्णधारपदी नितीश राणा : केकेआरने नितीश राणा याची कर्णधारपदी निवड केली असून चंद्रकांत पंडित संघाचे नवे प्रशिक्षक आहेत. सलग सात हंगामात 450+ धावा करणारा शिखर धवन हा एकमेव फलंदाज आहे. पंजाब 2014 पासून प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही. लियाम लिव्हिंगस्टोन आणि कागिसो रबाडा हे पहिल्या सामन्यात पंजाब संघात नसतील. त्याचबरोबर केकेआर शाकिब अल हसन आणि लिटन दासशिवाय मैदानात उतरणार आहे.
पंजाब किंग्जपेक्षा केकेआर वरचढ : या दोघांमध्ये झालेल्या गेल्या पाच आमने-सामने सामन्यांमध्ये केकेआरचा वरचष्मा राहिला आहे. केकेआरने तीन सामने जिंकले आहेत तर पंजाबला दोन सामने जिंकता आले आहेत. हे पाच सामने आयपीएल 2022 मध्ये खेळले गेले. तेव्हा पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल होता, त्याला संघाने सोडले आहे. यावेळी धवनच्या नेतृत्वाखाली पंजाबची सुरुवात कशी होणार हे पाहावे लागेल. दुसरीकडे, राणा यांनाही विजयाने प्रचाराची सुरुवात करायला आवडेल.
आजच्या सामन्यात होणारे दोन्ही संघ :
पंजाब किंग्ज संघ : शिखर धवन (क), मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, भानुका राजपक्षे, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग (डब्ल्यू), सिकंदर रझा, सॅम कुरान, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग, राज बावा, नॅथन एलिस, बलतेज सिंग, जितेश शर्मा, अथर्व तायडे, विद्वत कवेरप्पा, मोहित राठी, शिवम सिंग
कोलकाता नाइट रायडर्स संघ: व्यंकटेश अय्यर, रहमानउल्ला गुरबाज (w), नितीश राणा (क), रिंकू सिंग, एन जगदीसन, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव, डेव्हिड विसे, मनदीप सिंग, अनुकुल रॉय, कुलवंत खेजरोलिया, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा
हेही वाचा : IPL 2023 : आयपीएलच्या महासंग्रामातील थरार पाहा एकाच क्लिकवर; प्रत्येक सामन्याचे वेळापत्रक