ETV Bharat / sports

IPL 2022 SRH vs GT : नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे, दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

आयपीएल 2022 मधील 21 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( SRH vs GT ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता डीवाय पाटील मैदानावर खेळला जाईल. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

author img

By

Published : Apr 11, 2022, 7:21 PM IST

SRH vs GT
SRH vs GT

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील 21 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना आज संध्याकाळी साडेसात वाजता डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ( Sunrisers Hyderabad opt to bowl ) निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

डीवाय पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवरून गोलंदाजांना बाऊन्स मिळतो. ही खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठी योग्य आहे, तसेच सामना रात्री खेळवला जात आहे. यामुळे येथे दवांची भूमिका महत्त्वाची असणार आहे . येथे 60 टक्क्यांहून अधिक सामने पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी आणि दर्शन नळकांडे.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन.

हेही वाचा - R Ashwin Retired Out : आयपीएल इतिहासात रिटायर्ड आउट होणारा आश्विन ठरला पहिला फलंदाज; रिटायर्ड आउट म्हणजे काय, जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.