ETV Bharat / sports

IPL 2022 Points Table : आयपीएलच्या 39 व्या सामन्यानंतर अशी आहे गुणतालिका; जाणून घ्या ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाकडे?

author img

By

Published : Apr 27, 2022, 5:32 PM IST

आयपीएल 2022 मध्ये 39 वा सामना पार पडल्यानंतर, राजस्थानचा संघ गुजरात टायटन्सला दुसऱ्या स्थानावर ढकलत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर दोघांचे गुण 12-12 आहेत. पण दोघांच्या नेट रन रेटमध्ये फरक आहे. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादने 10 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे.

IPL Point Table
IPL Point Table

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) मध्ये सर्व संघांनी किमान सात सामने खेळले आहेत. अशा स्थितीत आता प्लेऑफची स्थिती स्पष्ट होऊ लागली आहे. स्पर्धेतील 39व्या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ ( Rajasthan Royals team ) गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) दुसऱ्या तर हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता खूप जास्त आहे.

त्यानंतर, बंगळुरु ( RCB ) आणि लखनऊ ( LSG ) यांच्यात प्लेऑफचा चौथा संघ ठरण्यासाठी मुकाबला सुरूच आहे. पंजाब, दिल्ली आणि कोलकाता हे संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत, पण या तिन्ही संघांना अव्वल चारमध्ये स्थान मिळवणे फार कठीण जाईल. मुंबई आणि चेन्नई पॉईंट टेबलमधील शेवटचे दोन स्थानावर आहेत. त्यामुळे या दोन संघांना प्लेऑफमध्ये केवळ चमत्कारानेच जागा मिळू शकते. पंजाबचा शिखर धवन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. मात्र, या शर्यतीत जोस बटलर आघाडीवर आहे. त्याचबरोबर विकेट घेण्याच्या बाबतीत चहल आघाडीवर आहे.

IPL 2022 Points Table
आयपीएल 2022 गुणतालिका

39 सामन्यानंतर गुणतालिकेची सध्याची स्थिती - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवासह राजस्थानचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आहे. गुजरात दुसऱ्या तर हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे तिन्ही संघ प्लेऑफमध्ये ( Playoff race ) पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. लखनौ चौथ्या आणि आरसीबी पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनण्यासाठी या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. पंजाब सहाव्या, दिल्ली सातव्या आणि कोलकाता आठव्या स्थानावर आहे. हे तिन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतही सामील आहेत, पण त्यांना अव्वल चारमध्ये स्थान मिळवणे फार कठीण जाईल. नवव्या स्थानावर असलेल्या चेन्नईला अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी जवळपास प्रत्येक सामना जिंकावा लागेल. त्याचबरोबर दहाव्या क्रमांकावर असलेला, मुंबई संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (ऑरेंज कॅप)

  • जोस बटलर- 499
  • लोकेश राहुल- 368
  • शिखर धवन- 302
  • हार्दिक पांड्या- 295
  • फाफ डु प्लेसिस- 278

सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज (पर्पल कॅप)

  • युझवेंद्र चहल- 18
  • टी नटराजन- 15
  • ड्वेन ब्रावो- 14
  • वनिंदू हसरंगा- 13
  • कुलदीप यादव- 13

हेही वाचा - Sanjay Bangar Statement : आरसीबी पराभवातून लवकरच सावरेल - संजय बांगर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.