मुंबई: सोमवारी (9 मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Kolkata Knight Riders vs Mumbai Indians ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 56 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना डी.व्हाय. पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी ही स्पर्धा फक्त औपचारिकता राहिली आहे. कारण हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर कोलकाता संघ देखील जवळपास बाहेर गेला आहे.
मुंबई इंडियन्स संघाने ( Mumbai Indians Team ) आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दहा सामने खेळले आहेत. त्यापैकी आठ सामने गमावले आहेत आणि दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या संघाच्या खात्यात फक्त चार गुण असून संघ गुणतालिकेत तळाशी आहे. त्याचबरोबर दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्स संघाने ( Kolkata Knight Riders Team ) अकरा सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात विजय तर सात सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे हा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे.
सुरुवातीचे आठ सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सने गेल्या दोन सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्ससारख्या मोठ्या संघांना पराभूत केले आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी लयीत दिसली आणि दोघांनीही चांगली खेळी केली. याशिवाय मधल्या फळीत वेगवान फलंदाजी करताना टीम डेव्हिडने ( Batsman Tim David ) फिनिशिंगचे कौशल्यही दाखवले. डॅनियल सॅम्सने काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर, शेवटच्या सामन्यात शेवटच्या षटकात नऊ धावांचा बचाव करत सुधारणा केली आहे. अशा स्थितीत उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून स्पर्धा पूर्ण करण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या कामगिरीने कमालीची निराशा केली आहे. सुरुवातीला चांगली कामगिरी केल्यानंतर, संघ आपल्या लयीत दिसत नाही आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्याच्या मार्गावर आहे. शेवटच्या सामन्यात संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. आरोन फिंच आणि बाबा इंद्रजीत प्रभावित करण्यात अपयशी ठरले. त्याचबरोबर कर्णधार श्रेयस अय्यरही ( Captain Shreyas Iyer ) शॉर्ट चेंडूंसमोर संघर्ष करताना दिसला आहे. संघाची सर्वात मोठी समस्या म्हणजे संतुलित संयोजन शोधणे, जे अद्याप सोडवले गेले नाही.
हेही वाचा - IPL 2022, CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी पराभव