ETV Bharat / sports

IPL 2022 Closing Ceremony : आयपीएल 2022 च्या समारोप सोहळ्याला मोदी-शहा याच्यासंह, रणवीर सिंग आणि एआर रहमानची उपस्थिती - गुजरात टायटन्स

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा अंतिम सामना आज म्हणजेच 29 मे रोजी आहे. हा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. येथे आयपीएल 2022 चा समारोप समारंभही आयोजित केला जाईल. कोरोनामुळे समारोप समारंभ झाला नाही. 2019 आयपीएलमध्ये शेवटच्या वेळी समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर आता या वर्षी हा सोहळा आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये अनेक बॉलीवूड स्टार्ससह राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

IPL 2022 Closing Ceremony
IPL 2022 Closing Ceremony
author img

By

Published : May 29, 2022, 4:57 PM IST

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (29 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) संघात होणार आहे. या सामन्यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2022 चा समारोप सोहळा आयोजित केला जाणार आहे. शेवटच्या वेळी 2019 आयपीएलमध्ये समारोप समारंभ आयोजित करण्यात ( IPL 2022 Closing Ceremony ) आला होता. हा सोहळा किती वाजता सुरू होईल आणि बॉलिवूडचे कोणते स्टार्स यात हजेरी लावणार आहेत, याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

  • When there is @RanveerOfficial, there is nothing but oodles of energy. ⚡✨

    How excited are you to witness Ranveer set the stage on fire at the #TATAIPL 2022 Final Closing Ceremony at the Narendra Modi Stadium, Ahmedabad❓ 🎆 🎆 https://t.co/uQE7SUWN8n

    — IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फायनल सामना रात्री आठला सुरु होणार -

आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यासह आयपीएलच्या समारोप सोहळ्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलच्या तीन हंगामानंतर समारोप समारंभ आयोजित केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या तीन हंगामात त्याचे आयोजन करता आले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समारोप समारंभ 45 मिनिटांचा असणार आहे. त्याचबरोबर या अंतिम सामन्याची वेळ 7:30 वरून 8:00 करण्यात आली असून नाणेफेक 7:30 वाजता होणार आहे.

रणवीर सिंग, एआर रहमान आणि बॉलिवूड स्टार्सही सहभागी होणार -

बॉलीवूड स्टार्स दाखवणार आपला जलवा
बॉलीवूड स्टार्स दाखवणार आपला जलवा

समारोप सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्सही सहभागी होणार आहेत. त्यात अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार एआर रहमान ( Ranveer Singh and AR Rahman ) यांच्या नावाचाही समावेश आहे. हे दोन्ही स्टार्स समारोप समारंभात थिरकायला सज्ज झाले आहेत. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील परफॉर्म करताना दिसणार आहे. वृत्तानुसार, आमिर खान देखील त्याच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलर लाँच करण्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.

आयपीएलच्या समारोप सोहळ्याला मोदी-शहांची उपस्थिती -

आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात बीसीसीआयचे उच्चस्तरीय अधिकारी सहभागी होणार आहेत, ज्यात अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल आदींचा समावेश असेल. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे ( Gujarat Cricket Association ) अधिकारी आणि राज्यातील काही राजकीय व्यक्तीही या सामन्यात सहभागी होऊ शकतात. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ( PM Modi & Amit shah ) देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

समारोप सोहळ्याला दिसणार झारखंडच्या जगप्रसिद्ध छाऊ नृत्याचा रंग -

छाऊ नृत्याचा सराव करणारी टीम
छाऊ नृत्याचा सराव करणारी टीम

झारखंडच्या जगप्रसिद्ध छाऊ नृत्याचा रंग यावेळी आयपीएलमध्येही पाहायला मिळणार आहे. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात, झारखंडच्या सरायकेला-खरसावन संघाने भव्य छाऊ नृत्याच्या सादरीकरणासाठी अहमदाबादला पोहोचल्यानंतर सराव पूर्ण केला आहे. सर्व कलाकार इचगढ ब्लॉकमधील चोगा या दुर्गम गावातील रहिवासी आहेत.

यामध्ये प्रभात कुमार महातो (नेतृत्वकर्ता), सुजन महातो, जगदीश चंद्र महतो, श्रावण गोप, सीताराम महातो, रामदेव महातो, गणेश महातो, सदानंद गोप, मंटू महातो आणि ललित महतो यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Ipl 2022 Final Rr Vs Gt : संजूसेना विरुद्ध हार्दिकसेना आज फायनलसाठी सज्ज, कोण मारणार बाजी?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.