सिडनी - ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची फलंदाज ग्रेस हॅरिसने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. ''खेळाचा महान फिनिशर'', असे हॅरिसने धोनीचे कौतुक करताना म्हटले.
शनिवारी महिला बिग बॅश लीगच्या (डब्ल्यूबीबीएल) सहाव्या सत्राच्या उद्घाटन सामन्यात हॅरिसने पर्थ स्कॉर्चर्सविरूद्ध ३७ चेंडूत ५३ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या स्फोटक खेळूीमुळे ब्रिस्बेन हीटने पर्थ स्कॉर्चर्सला ७ गडी राखून पराभूत केले.
सामन्यानंतर हॅरिस म्हणाली, "मी धोनीची खेळी बघते. मी त्याच्याकडून प्रेरणा घेत आहे. तो खेळाचा एक उत्तम फिनिशर आहे. तो मागे राहू शकतो पण शेवटी तो सामना जिंकतो आणि हे महत्वाचे आहे.''
धोनी आणि आयपीएल २०२० -
सध्या धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईची कामगिरी सुमार राहिली असून ते स्पर्धेबाहेर झाले आहेत. चेन्नईला मागील सामन्यात मुंबईकडून १० गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला.