ऑकलंड : भारतीय महिला संघ ( Indian women's team ) न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. ज्या ठिकाणी मार्च पासून आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगत आहे. भारतीय संघाचे चार सामने पार पडले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ दोन विजय आणि दोन पराभवामुळे चार गुणांलह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. या स्पर्धेतली भारताचा पुढील सामना शनिवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. त्या अगोदर भारतीय महिला संघानी आज होळीचा सण साजरा करुन त्याचा आनंद घेतला आहे. त्याचबरोबर या खेळाडूंनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
-
Ringing in the festivities post practice in Auckland 🎉 🎨
— BCCI Women (@BCCIWomen) March 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here's #TeamIndia 🇮🇳 wishing everyone a Happy Holi all the way from New Zealand 🇳🇿#CWC22 pic.twitter.com/fipSh92Z0F
">Ringing in the festivities post practice in Auckland 🎉 🎨
— BCCI Women (@BCCIWomen) March 18, 2022
Here's #TeamIndia 🇮🇳 wishing everyone a Happy Holi all the way from New Zealand 🇳🇿#CWC22 pic.twitter.com/fipSh92Z0FRinging in the festivities post practice in Auckland 🎉 🎨
— BCCI Women (@BCCIWomen) March 18, 2022
Here's #TeamIndia 🇮🇳 wishing everyone a Happy Holi all the way from New Zealand 🇳🇿#CWC22 pic.twitter.com/fipSh92Z0F
तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( Board of Control for Cricket in India ) आपल्या ट्विटरवर लिहिले की, ऑकलंडमध्ये सरावानंतर उत्सवाचे वातावरण आहे. इथे न्यूझीलंडमध्ये, टीम इंडियाकडून सर्वांना होळीच्या शुभेच्छा. याबरोबरच बीसीसीआयने काही फोटो देखील ट्विट केले आहेत.
वसंत ऋतूच्या सुरुवातीला होळी हा रंगांचा सण ( Holi festival of colors ) साजरा केला जातो. जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. जरी होळी हा प्रामुख्याने हिंदूचा सण असला, तरी तो इतर धर्माचे लोकही साजरा करतात. हे देशात वसंत ऋतु पिकाच्या हंगामाचे आगमन दर्शवतो.
'होली है' असा नारा देत लोक मिठाई, थंडाई आणि रंगांनी सण साजरा करतात. सध्याच्या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाचा पुढील सामना शनिवारी ऑकलंडमध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. तसेच अजून तीन सामने खेळले जाणे बाकी आहेत.