हैदराबाद: जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग म्हणून आयपीएल स्पर्धेला ओळखले जाते. यंदा या आयपीएल स्पर्धेचा पंधरावा हंगामा खेळला जात आहे. जस-जसा हा हंगाम पुढे जात आहे तस तसा स्पर्धेतील रोमांच वाढत आहे. यंदाच्या हंगामातील आतापर्यंत 32 सामने खेळले गेले आहेत. यावेळी या स्पर्धेत दोन नवीन संघ जोडले गेले आहेत. या स्पर्धेत प्रथमच 10 फ्रँचायझी संघ मैदानात उतरले असून त्यामुळे सामन्यांची संख्या तसेच थरार स्पष्टपणे वाढत आहे. दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals ) पंजाब किंग्जचा 18 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुणतालिकेत काही बदल झाले आहेत. गुणतालिकेत गुजरात टायटन्स अव्वल, तर आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर आला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी पंजाब किंग्जला नऊ गडी राखून पराभूत करून तिसरा विजय नोंदवला. दिल्लीचा हा केवळ सहावा सामना होता आणि आता तो गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. या विजयापूर्वी दिल्लीचा संघ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) च्या खाली 8 व्या स्थानावर होता.
-
A look at the Points Table after Match 3⃣2⃣ of the #TATAIPL 2022 🔽 #DCvPBKS pic.twitter.com/ijVOMb6YBq
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A look at the Points Table after Match 3⃣2⃣ of the #TATAIPL 2022 🔽 #DCvPBKS pic.twitter.com/ijVOMb6YBq
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022A look at the Points Table after Match 3⃣2⃣ of the #TATAIPL 2022 🔽 #DCvPBKS pic.twitter.com/ijVOMb6YBq
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
आज या लीगमधील दोन सर्वात यशस्वी आणि चॅम्पियन संघ, मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) एकमेकांशी भिडत आहेत. मात्र या सामन्यात कोणताही संघ जिंकला तर गुणतालिकेतील अव्वल 8 स्थानांमध्ये कोणताही बदल होणार नाही. चेन्नईचा संघ या मोसमात केवळ एकच विजय नोंदवू शकला असून तो 2 गुणांसह 9व्या स्थानावर आहे, तर सलग 6 सामने गमावलेला मुंबईचा संघ अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा करत आहे.
आयपीएल 2022 ऑरेंज कॅप -
- जोस बटलर (RR): 375 रन (6 मैच, 6 पारियां)
- केएल राहुल (LSG): 265रन (7 मैच, 7 पारियां)
- फाफ डु प्लेसिस (RCB): 250 रन (7 मैच, 7 पारियां)
- श्रेयस अय्यर (KKR): 236 रन (7 मैच, 7 पारियां)
- हार्दिक पांड्या (GT): 228 रन (5 मैच, 5 पारियां)
आयपीएल 2022 पर्पल कॅप -
- युझवेंद्र चहल (RR): 17 विकेट (6 सामने, 6 डाव)
- कुलदीप यादव (DC): 13 विकेट (6 सामने, 6 डाव)
- टी. नटराजन (SRH): 12 विकेट (6 सामने, 6 डाव)
- आवेश खान (LSG): 11 विकेट (6 सामने, 6 डाव)
- वनिंदु हसरंगा (RCB): 11 विकेट (7 सामने, 7 डाव)
हेही वाचा - IPL 2022 MI vs CSK : नाणेफेक जिंकून सीएसकेचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, मुंबई संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी