ETV Bharat / sports

IND vs SL 1st Test : रिषभ पंतची जोरदार फटकेबाजी ; पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारत 6 बाद 357 - विराट कोहलीचा 100 वा कसोटी सामना

भारत विरुद्ध श्रीलंका ( IND vs SL ) संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाने 85 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 357 धावसंख्या उभारली आहे.

Rishabh Pant
Rishabh Pant
author img

By

Published : Mar 4, 2022, 6:19 PM IST

मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात पहिला शुक्रवार (4 मार्च) पासून पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना पंजाब क्रिकेट असोसियनच्या आय एस बिंद्रा मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 85 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 357 धावसंख्या उभारली.

विराटच्या आठ हजार धावा पूर्ण तर रिषभचे हुकले शतक -

भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जात असलेला पहिला कसोटी सामना विराट कोहलीचा 100 वा कसोटी सामना ( Virat Kohli 100th Test match ) आहे. या सामन्यात विराट कोहली 45 धावांची खेळी करताना आपल्या आठ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावा भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक धावा ( Rishabh Pant highest score ) केल्या. त्याने आपल्या खेळीत 97 चेंडूंचा सामना करताना 9 चौकारांच्या आणि 4 षटकारांच्या मदतीने 96 धावा केल्या. त्याचबरोबर फक्त चार धावांनी त्याचे शतक हुकले.

हनुमा विहारीची अर्धशतकी खेळी -

भारतीय संघाने प्रथम खेळताना धावांची सुरुवात चांगली केली होती. भारताच्या सलामी फलंदाजांनी पहिल्या गड्यासाठी 52 धावांची खेळी केली होती. कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) 29 (28), मयंक अग्रवाल 33(49), हनुमा विहारी ( Half century of Hanuma Vihari ) 58(128), विराट कोहली 45(76) आणि श्रेयस अय्यर 27(48) धावा केल्या. त्याचबरोबर रवींद्र जडेजा 45 आणि आर आश्विन 10 धावांवर नाबाद आहेत.

श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना लसिथ एम्बुल्डेनियाने सर्वाधिक 2 विकेट्स ( Lasith Ambuldenia 2 wickets ) घेतल्या. त्याचबरोबर विश्वा फर्नाडो, लहिरु कुमारा, सुरंगा लकमल आणि धनंजया डी सिल्वा यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.

हेही वाचा - Women World Cup : न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात झालेल्या रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.