ETV Bharat / sports

AUSW vs INDW: गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव नाही; डे नाइट कसोटीआधी अस का म्हणाली मिताली

प्रामाणिकपणे सांगते, मला गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव नाही. मी पण पहिल्यांदा खेळत आहे. पण सूर्यास्त झाल्यानंतरच्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे. कारण त्यावेळी गुलाबी चेंडूवर खेळणे खूप कठिण असल्याचे सर्वजण म्हणतात. मी खेळल्यानंतर त्याचा अनुभव कसा होता हे सांगू शकेन, असे मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी म्हटलं आहे.

india-vs-australia-day-night-test-mithali-raj-says-i-do-not-have-the-experience-of-playing-with-pink-ball
AUSW vs INDW: मला गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव नाही, डे नाइट कसोटीआधी अस का म्हणाली मिताली राज
author img

By

Published : Sep 29, 2021, 3:49 PM IST

Updated : Sep 29, 2021, 4:46 PM IST

गोल्ड कोस्ट - भारत महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील एकमात्र डे-नाईट कसोटी सामन्याला सुरूवात होण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. भारतीय संघाला या कसोटी सामन्यासाठी सराव करण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी मिळाला. या दरम्यान, भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने डे नाइट कसोटी सामन्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मिताली राजने ऐतिहासिक कसोटी सामन्याआधी बोलताना म्हणाली की, प्रामाणिकपणे सांगते, मला गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव नाही. मी पण पहिल्यांदा खेळत आहे. पण सूर्यास्त झाल्यानंतरच्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे. कारण त्यावेळी गुलाबी चेंडूवर खेळणे खूप कठिण असल्याचे सर्वजण म्हणतात. मी खेळल्यानंतर त्याचा अनुभव कसा होता हे सांगू शकेन.

भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला -

भारतीय महिला संघाला एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभव पत्कारावा लागला. पण अखेरचा सामना जिंकून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखला. ऑस्ट्रेलियाने सलग 26 एकदिवसीय सामने जिंकले होते. याविषयावरून मिताली म्हणाली की, त्या कामगिरीमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेआधी सर्वश्रेष्ठ संघाविरुद्ध खेळणे ही एक चांगली तयारी आहे. पहिल्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. तेव्हा मी खेळाडूंना खेळामधील बारकावे सांगून काही टिप्स दिल्या. यानंतर खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाली.

भारताने सात वर्षांनंतर पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. हा सामना अनिर्णीत राखण्यात भारताला यश आले. त्याआधी भारताने 2006 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. याविषयी मिताली म्हणाली की, तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही संघांनी मोठा पल्ला गाठला आहे. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये आम्ही मोठी धावसंख्या उभारली आहे. ही चांगली मालिका आहे. एकूणच काय तर जगात महिला क्रिकेटने मोठा पल्ला गाठला आहे आणि याचे भविष्य उज्ज्वल आहे.

हेही वाचा - MI vs PBKS : मुंबईची पंजाबवर ६ गडी राखून मात; हार्दिक पंड्याची दमदार खेळी

हेही वाचा - RCB vs RR: आरसीबीचा विजयी लय राखण्याचा निर्धार; राजस्थानसाठी 'करो या मरो'ची लढत

Last Updated : Sep 29, 2021, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.