ETV Bharat / sports

जलदगती गोलंदाज टी.नटराजनने केले भारतासाठी पदार्पण - 11th left-arm indian fast bowler

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैदराबादकडून यंदाचा आयपीएल हंगाम गाजवल्यानंतर नटराजसाठी टीम इंडियाचे दार खुले झाले. पहिल्या दोन सामन्यात गोलंदाजांनी सुमार कामगिरीचे दर्शन घडवले. त्यानंतर बदल म्हणून नटराजनला संघात घेण्यात आले.

t natarajan becomes the 11th left-arm fast bowler to play for India
जलदगती गोलंदाज टी.नटराजनने केले भारतासाठी पदार्पण
author img

By

Published : Dec 2, 2020, 2:03 PM IST

नवी दिल्ली - वेनवान गोलंदाज टी. नटराजनसाठी आजचा दिवस आनंददायी ठरला. यंदाच्या आयपीएलमध्ये फलंदाजांची भंबेरी उडवणारा नटराजन हा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ११वा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. नटराजनने बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

हेही वाचा - विराटचा वनडेत भीमपराक्रम, क्रिकेटच्या देवाला टाकले मागे

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सनरायझर्स हैदराबादकडून यंदाचा आयपीएल हंगाम गाजवल्यानंतर नटराजसाठी टीम इंडियाचे दार खुले झाले. पहिल्या दोन सामन्यात गोलंदाजांनी सुमार कामगिरीचे दर्शन घडवले. त्यानंतर बदल म्हणून नटराजनला संघात घेण्यात आले.

t natarajan becomes the 11th left-arm fast bowler to play for India
टी.नटराजन

तामिळनाडूचा पाचवा गोलंदाज -

नटराजन भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण करताना तामिळनाडूचा पाचवा गोलंदाज आहे. याआधी १९८२ मध्ये टी.ए. शेखर यांनी भारतीय संघात पदार्पण केले होते. त्यानंतर बी. अरुण (१९८६), टी कुमारन (१९९९), बालाजी (२००२) आणि नटराजन (२०२०) यांनी भारतीय संघात पदार्पण केले आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये नटराजनने आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे. २० प्रथम श्रेणी सामन्यात ६४ बळी घेतले आहेत. तर, यंदाच्या आयपीएलच्या १६ सामन्यात नटराजनने १६ बळी घेतले आहेत. एक 'यॉर्कर स्पेशालिस्ट' गोलंदाज म्हणून नटराजकडे पाहिले जाते. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मार्नस लाबुशेनला त्रिफळाचीत करत नटराजनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. लाबुशेनने १३ चेंडूत ७ धावा केल्या.

टीम इंडियाचे डावखुरे गोलंदाज -

  • कर्सन घावरी
  • रुद्र प्रताप सिंह (१९८४-१९९६)
  • राशिद पटेल
  • झहीर खान
  • आशिष नेहरा
  • इरफान पठाण
  • रुद्र प्रताप सिंह (२००५-२०११)
  • जयदेव उनाडकट
  • बरिंदर सरन
  • खलील अहमद
  • टी.नटराजन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.